मुंबईजवळ सापडला भयंकर कोरोना व्हायरस, अँटिबॉडीलाही जुमानत नाही!

Coronavirus

मुंबई : खारघरमधील टाटा मेमोरिअल सेंटरमध्ये मुंबई मेट्रोपोलिटन रिजनमधील तीन रुग्णांमध्ये E484K म्‍युटेशन असलेला कोरोना व्हायरस सापडला आहे. हा व्हायरस दक्षिण आफ्रिकेत सापडलेला नवा कोरोनाव्हायरस असल्याची माहिती आहे.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनपेक्षाही दक्षिण आफ्रिकेतील हा स्ट्रेन अधिक भयंकर आहे. कारण कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरात तयार होणाऱ्या तिन्ही प्रकारच्या अँटिबॉडीज या व्हायरसविरोधात लढण्यास प्रभावी नाहीत. तीन रुग्णांपैकी रुग्ण ठाण्यातील आणि एक रायगडमधील आहे.

टाटा मेमोरिअल सेंटरचे डॉ. निखिल पाटकर यांनी सांगितलं की, सेंटरच्या टीमने ७०० नमुन्यांचे ‘जीन सिक्वेंसिंग’ केले होते. त्यातील तिघांमध्ये E484K म्युटेशन सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोनाव्हायरचे तीन म्युटेशन आढळून आले. आमच्या रुग्णालयातील रुग्णांंमध्ये सापडलेला व्हायरसचा स्ट्रेन हा त्याच तीन म्युटेशनपैकी एक आहे.

दरम्यान, बंगळुरूतील संसर्गजन्य आजाराचे तज्ज्ञ डॉ. गिरीधर बाबू याबाबत म्हणाले की, E484K म्युटेशन व्हायरस सप्टेंबर २०२० पासून रुग्णांमध्ये आहे. तो वेगाने पसरणारा असता तर आतापर्यंत परिस्थिती अधिक गंभीर झाली असती. पण तसे झाले नाही. त्यामुळे या व्हायरसला घाबरण्याची गरज नाही.

यूकेत आढळलेल्या नव्या कोरोनाचे भारतात ९० रुग्ण आहेत. त्यापैकी ११ महाराष्ट्रात आहेत. मुंबई, पिंपरी-चिंचवडमध्ये प्रत्येकी ३, पुण्यात २ आणि मिरा-भाईंदरमध्ये एक रुग्ण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER