अदर पुनावालांच्या जीवाला धोका, प्रतिष्ठीत टिव्ही पत्रकारानं घेतलं शिवसेनेचं नाव

Adaer Poonawala - Maharashtra Today

देशात कोरोनाची दुसरी लाट हानीकारक ठरते आहे. राज्यासह देशभरात यामुळं आरोग्य आणीबाणीची परिस्थीती निर्माण झालीये. अशातच कोरोनातून जीव वाचवण्यासाठी लसकरण महत्त्वाचं मानलं जातय. भारताला कोरोनाची लसपुरवठा करण्यात आदर पुनावाल यांच्या ‘सीरम इन्स्टिट्यूट’ (Serum Institute) या लस उत्पादक कंपनीचा मोठा वाटा आहे. संपुर्ण देशातल्या नागरिकांचा जीव सुरक्षित रहावा म्हणून लस उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांचाच जीव धोक्यात असल्याची बातमी धक्कादायक आहे. स्वतः अदर पुनावाला यांनी ‘टाइम्स’ सारख्या प्रतिष्ठीत माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीत ही गोष्ट स्वतः बोलून दाखवलीये.

नेमकं प्रकरण काय आहे?

सीरम इन्स्टिट्यूटचे मालक अदर पुनावाला सध्या परदेशात आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ‘टाईम्स’ या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. करोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीने आता उद्योजकांच्या मनात धडकी भरवली आहे. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहीमेत वापरल्या जाणाऱ्या कोव्हीशील्ड लसींच्या मागणीसाठी भारतातील बडे नेते आणि काही राज्यांच्या मुख्यमंत्र्याकडून गंभीर स्वरूपाचे फोन कॉल्स येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी केला होता.

जगभरात भारताच्या प्रतिमेला धक्का बसू शकतो

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठात बनलेल्या लसीचे उत्पादन अदर पुनावाला यांच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये घेतलं जातं. ब्रिटीनसह जगभरता या लसीची आणि ही लस बनवणाऱ्या कंपनीचं नाव पोहचलं. यानंतर जागतिक पटलावर अदर पुनावाला हे नाव पोहचलं. त्यामुळं त्यांच्या संबंधातल्या बातम्यांवरही जगाची नजर असते. अदर पुनावाला यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातम्या समोर आल्यानं जागतिक पटलावर भारताच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालीये. संपूर्ण जगभरात कोरोना रोखण्यासाठी लस बनवणारी अव्वल कंपनी असलेली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदर पूनावाला यांना लसींसाठी मोठ्या प्रमाणात फोन येत असून काही जणांकडून धमक्याही दिल्या जात असल्याची माहिती पुनावाला यांनी दिली होती. मला येणारे फोन कॉल्स अत्यंत वाईट बाब आहे. फोन करणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठित लोकांचा समावेश देखील आहे,

इंडीया टुडेविरुद्ध शिवसेना

अदर पुनावाला यांनी जीवाला धोका असल्याची भीती प्रसार माध्यमांसमोर बोलून दाखवल्यानंतर देशभरातलं राजकारणं चांगलचं तापलं होतं. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलंय. या प्रकरणी ‘इंडिया टुडेच्या वरिष्ठ पत्रकाराने धक्कदायक विधान केले आहे. शिवसेनेतील काही गुंडांनी सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अदर पुनावाला यांना धमकावले. त्यामुळे अदर पुनावाला परदेशात निघून गेले, असे वक्तव्य ‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीचे सूत्रसंचालक राहुल कनवाल यांनी केलंय. या विधानावरून आता शिवसेनेने इंडिया टुडेला चांगलेच फैलावर घेतलंय.

सुभाष देसाई म्हणतात हा शिवसेनेच्या बदनामीचा कट

एका प्रतिष्ठित वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने केलेल्या आरोपांवर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उद्योग मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी यासंदर्भात इंडिया टुडे समूहाला पत्र पाठवून राहुल कनवाल यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या पत्रात सुभाष देसाई यांनी लिहिले आहे की, राहुल कनवाल यांनी तुमच्या वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अदर पुनावाला यांना शिवसेनेच्या गुंडांनी लसीसाठी धमकावल्याचे म्हटले. ही गोष्ट धादांत खोटी आणि बदनामीकारक आहे.

शिवसेनेची प्रतिमा मलीन करण्याच्या कटाचा हा भाग वाटतो. कदाचित या माध्यमातून सध्या देशभरात सुरु असलेले कोरोनाचे थैमान आणि विधानसभा निवडणुकीच्या निकाल या विषयांवरील लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.आमचा ‘इंडिया टुडे’ समूहाच्या पत्रकारितेवर विश्वास आहे. त्यामुळे राहुल कनवाल यांनी याबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुभाष देसाई यांनी पत्रात केली आहे.

सचिन वाझे प्रकरणानंतर गांभीर्यात वाढ

सचिन वाझे प्रकरणात समोर आलेले धक्कादायक खुलासे, सचिन वाझे आणि शिवेसनेच्या संबंधांचे आरोप, मुख्यमंत्र्यांनी वाझेंची केलेली पाठराखण, परमबीर सिंहाचे १०० कोटींचे आरोप, अनिल देशमुखांचा राजीनामा, त्यांच्यावर सी.बी.आय.नं केलेली एफ.आय.आर. यामुळं महाविकास आघाडी आणि पर्यायानं शिवसेना यांची प्रतिमा मलिन झालीये. मंगळवेढा- पंढरपूर पोटनिवडणूकीचा निकाल ही बाब सिद्ध करत असल्याचं भाजपचं म्हणनं आहे. अशा परिस्थीतीत अदर पुनावालांच्या जीवाला असलेला धोका आणि त्यासंबंधी राहुल कनवाल यांनी शिवसेनेचं घेतलेलं नाव मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात घडवून आणू शकतो असं राजकीय विश्लेष्कांच मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button