अंबाबाईच्या मंदिराला धोका : छताचे काम करण्याची गरज

Kolhapur Ambabai temple

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या छताची गळती काढण्यासाठी वेळोवेळी करण्यात आलेल्या कोब्यामुळे मंदिराच्या मुळ स्वरुपात बदल झाला आहे. या कारणाने आत्तापर्यंत १ हजार टन वजनाचे सिमेंट काँक्रिट छतावर टाकले आहे. स्ट्रक्चरल ऑडिट नंतर एक हजार टन वजनाचा काँक्रिट म्हणजे शंभर ट्रक मातीचा थर मंदिराच्या छतावर असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे मंदिराला धोका पोहचू शकतो. लवकरच हे काँक्रिट काढुन मंदिर मुळ स्वरुपात आणण्यासाठी पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पावले उचलणार आहे.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीचे मंदिर म्हणजे वास्तुस्थापत्य कलेचा एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना मानला जातो. मंदिर जवळपास चौदाशे वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. शिल्पसौंदर्याने नटलेल्या मंदिराच्या मुळ स्वरुपात काळानुरूप अनेक बदल होत गेले आहेत. स्ट्रक्चरल ऑडिट नंतर एक हजार टन वजनाचा काँक्रिट म्हणजे शंभर ट्रक मातीचा थर मंदिराच्या छतावर असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मंदिर वास्तुला बाधा निर्माण होणे स्वाभाविक आहे. मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट मुबंई येथील स्टक्टवेल डिझायनर कन्सल्टंट यांच्याकडुन करण्यात आले आहे. स्ट्रक्चरल ऑडीट करत असताना मुख्य मंदिराच्या आतमधील व बाहेरील काही भागांवर रडार टेस्टींग केले आहे. त्यामधील रिपोर्टनुसार पहिला टप्पा म्हणजे मंदिराचे छत्ताचे वाॅटर प्रुफिंग करणे हा आहे. अहवालानुसार व मंदिराच्या छतावर घेण्यात आलेल्या चाचणी खड्यामध्ये सध्या अस्तित्वात असलेले वेगवेगळे थर याचा अभ्यास करुन त्याचे अंदाजपत्रक तयार करणेचे काम सुरु आहे. सदर अंदाजपत्रक पुरातत्व विभागाकडे मार्गदर्शन व परवानगी घेऊन कामास सुरुवात करण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER