तामिळनाडूत निवारनंतर बुरेवी वादळाचा धोका

Burevi Cyclone

चेन्नई :- तामिळनाडूत (Tamil Nadu) निवार चक्रीवादळानंतर बुरेवी वादळाचा परिणाम पाहायला मिळत आहे. केरळमध्येही याचा परिणाम पाहायला मिळत आहे. आज तामिळनाडू किनारी भाग हे चक्रीवादळ पार करेल, असा अंदाज आहे. भारतीय हवामान विज्ञान विभागाने (आयएमडी) ही माहिती दिली. आधी आयएमडीने अंदाज वर्तवला होता की, बुधवारी रात्री श्रीलंका तट पार करून बुरेवी वादळाच्या स्वरूपात तामिळनाडूच्या तटावर पोहचले. परंतु, वादळाचा दबाव कमी होऊन बुरेवी श्रीलंकेहून पुढे सरकले. श्रीलंकेच्या हवामान विभागाने म्हटले आहे की, उत्तरेकडे रात्री ‘बुरेवी’ दाखल झाल्यानंतर फारसे नुकसान झाले नाही. परंतु, पुढील २४ तासांपर्यंत वादळाचा परिणाम राहील. आपत्ती व्यवस्थापन केंद्राने म्हटले आहे की, श्रीलंकेच्या त्रिनकोमाली जिल्ह्यामध्ये तिरियाया आणि कुच्चावेली गावामध्ये चक्रीवादळ दाखल झाले आहे. तर भारतातदेखील आज, शुक्रवारी तिरुवनंतपुरम विमानतळ सकाळी १० वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

त्रिनकोमालीमध्ये चक्रीवादळामुळे २०० मिलिमीटर पाऊस झाला. काही ठिकाणी झाडेही कोसळली. येथे अचानक आलेल्या पुरामुळे १२ घरे बुडाली. येथील ६३० कुटुंबांना निवारा केंद्रात नेण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER