कोल्हापुरात पुन्हा महापुराचा धोका : पंचगंगा इशारा पातळीवर

Kolhapur.jpg

कोल्हापूर : गेल्या 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी तब्बल 17 फुटांनी वाढली. राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पातळी चाळीस फुटावर पोहोचले असून पंचगंगा इशारा पातळीवरून वाहत आहे. तब्बल 78 बंधारे पाण्याखाली गेले असून 26 सर्विस मार्ग बंद झाले आहेत. राधानगरी आणि काळमवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. राधानगरी धरण 90 टक्के भरले आहे. उद्या सकाळपर्यंत राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. यानंतर नदी पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता असल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा आदेश प्रशासनाने दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER