महाराष्ट्रात कांगो रोगाचा धोका

Congo Fever

मुंबई : गुजरातमधील बोताड व कच्छ जिल्ह्यांमध्ये क्रिमीन कांगो हेमोरेजिक फिवर या रोगाचा प्रादुर्भाव पशुधन मध्ये आढळून आला आहे. हा रोग झनोटिक म्हणजे ‘जनावरांपासून माणसांना होणारा रोग’ या स्वरूपाचा आहे. त्याचा प्रादुर्भाव गुजरातमधून महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

क्रिमीन कांगो हेमोरेजिक फिवर हा रोग नैरो या विषाणूमुळे होत आहे. हे विषाणू मुख्यत्वे गोचीडद्वारे एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला व बाधित जनावरापासून मानवांमध्ये संक्रमित होतात. गाय, म्हैस, शेळी, मेंढी अशा पाळीव प्राण्यांमध्ये तसेच शहामृग इत्यादी पक्ष्यांमध्ये सहसा या रोगाची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. पण अशी बाि जनावरे या विषाणूंचे वाहक असतात. त्यांच्या संपर्क मध्ये आलेल्या मानवांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. बाधित जनावरांचे मांस खाल्याने तसेच बाधित जनावरांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने मानवांना प्रादर्भाव होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER