डोक्यातील कोंडा दूर करतात साखर आणि कोरफड

dandruff

आपण सर्वच आपल्या केसांची निगा ठेवतो, पण तरी देखील केसांमध्ये काही ना काही समस्या होतात. केसात कोंडा होणे, केसांचे गळणे, केस सफेद होणे इत्यादी. सगळ्यात जास्त जी समस्या होते ती म्हणजे केसात कोंडा होणे. कोंडा आपल्या aloveraकेसांसाठी हानिकारक असतो. आपले केस काळे, लांब, दाट असावेत यासाठी केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील वेग वेगळे उपाय करत असतात. जर आपल्या केसात कोंडा होत असेल आणि सारखी सारखी केसात कोंड्यामुळे खाज सुटत असेल तर हि एक गंभीर समस्या होऊ शकते.  जर आपल्याला ही समस्या मुळापासून नष्ट करायच असेल तर आपण हा घरगुती उपाय करून पहा.

sugar

साखर आणि कोरफड ने डोक्यातील कोंड्याची समस्या दूर होऊ शकते. या साठी साखर आणि कोरफड मधील जेल एकत्र करून डोक्याच्या स्किन वर लावावे. कोरफड आणि आणि साखर डोक्यातील मृतस्किन काढण्यास मदत करते. साखर बारीक करून ती कोरफडच्या जेलमध्ये मिसळून घ्यावी. दोघांचं मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण डोक्याच्या स्किनवर लावावे. ३० मिनिटे झाल्यानंतर डोकं स्वच्छ धुवावे. केसांची वाढ करण्यासाठी देखील हे मदत करतं. खूप अधिक प्रमाणात डोक्यात कोंडा होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

ही बातमी पण वाचा : केस गळतीमुळे त्रस्त आहात ? मग जाणून घ्या हे उपाय