मुंबईत पुन्हा छमछम..डान्सबारवर छापा 11 बारगर्ल्ससह 20 जण ताब्यात

Police Raid In Dancebar

मुंबई : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर मागील सात ते आठ महिन्यांपासून लखलखणारी मुंबई (Mumbai) स्तब्ध झाली होती. हळूहळू अनलॉकचा (Unlock) टप्पा गाठत आता मुंबईत काही नियंमासह मुंबईत बंद असलेल्या बार आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली.

मात्र, बार (Bar) आणि हॉटेल्स (Hotels) सुरू होताच मुंबईत पुन्हा छमछम ऐकायला मिळाली आहे. रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या बारवर पोलिसांनी छापा मारला व 11 बारगर्लसह 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शुक्रवारी रात्री उशिरा गोरेगाव परिसरातील स्टार बार अँड रेस्टॉरंटवर (Restaurant) छापा मारला. रात्री 1 वाजेपर्यंत हा डान्स बार सुरूच होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बार रात्री 1 वाजेपर्यंत सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर स्टार बार आणि रेस्टॉरंटवर छापा टाकला असता 11 बारगर्ल्स डान्स फ्लोरवर डान्स करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी 11 बारगर्ल्ससह यावेळी 15 ग्राहक व अन्य 20 जणांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत डान्स बारमध्ये काम करणारे वेटर, सुपरवायझर, कॅशियर आणि मॅनेजरला अटक करण्यात आली आहे.

डीसीपी विशाल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली. लॉकडाउनच्या नियमाचे उल्लंघन करत रात्री उशिरापर्यंत हा बार सुरू होता. लॉकडाउनच्या काळात मुंबई पोलिसांनी केलेली ही पहिला कारवाई आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER