सांगली जिल्ह्यात दहा हजार हेक्टर पिकाचे नुकसान

सांगली जिल्ह्यात दहा हजार हेक्टर पिकाचे नुकसान

सांगली : चार-पाच दिवस पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात किमान दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. द्राक्ष, डाळिंब, ज्वारी, भुईमूग, उसाला मोठा फटका बसला आहे. लवकरच पंचनामे सुरू होणार असल्याचे कृषी खात्याने सांगितले आहे. त्यामुळे नुकसानीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

पश्चिम भागातील शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील ऊस, केळी अशी पिके भुईसपाट झाली आहेत. ज्वारी, सोयाबीन भिजल्याने शेतातच काजू लागले आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागातील तासगाव, कवठेमहांकाळ तालुका व मिरज पूर्व भागातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. तसेच खरीप पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.

आटपाडी, खानापूर तालुक्यातील डाळिंब बागांत मोठ्या प्रमाणात फूल व फळांची गळ झाली आहे. काही ठिकाणी जमीन खचली, वाहून गेली आहे. भाजीपाला शेतातच कुजला आहे. अनेक ठिकाणी हरितगृहांचेही नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन, बाजरी पूर्णत: पाण्यात भिजली आहे. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार 629 गावांतील 20 हजार शेतकऱ्यांचे दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER