अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे शेती, फळबागांचे नुकसान

unseasonal rains and cloudy weather

मुंबई : कालपासून मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे. त्याचा परिणाम कोकणात पहायला मिळतो आहे. रत्नागिरीत आज पहाटेपासून ढगाळ वातावरण आहे. सकाळच्या सुमारास आज तुरळक पावसाच्या सरी रत्नागिरीत पहायला मिळाल्या. यामुळे सगळ्यात मोठा फटका पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. या हवामानाचा परिणाम आंब्यावर होण्याची शक्याता वर्तवली जाते आहे. यामुळे आंबा हंगाम लांबवणीवर पडणार आहे. तर आंब्यावर तु़डतुड्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणावणार आहे. शहापूरमध्येही अवकाळी पावसाच्या जोरदार हजेरीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे भाजीपाला लागवड आणि वीट भट्टी यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे ढगाळ हवामानामुळे थंडी गायब झाल्याचंही पाहायला मिळालं. या अवकाळी पावसामुळे बळीराजाचं कंबरडं पुन्हा मोडणार असं बोललं जात आहे.

ढगाळ हवामानाचा रब्बी पिकं आणि फळबागांना फटका

खरंतर, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. कोकणासह नागपूर-विदर्भातही ढगाळ हवामान आहे. यामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसला आहे. विदर्भात चणा, गहू, तूर, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. इतकंच नाही तर रब्बी पिकांवरही कीड- रोगांचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे.

सध्या ढगाळ वातावरणामुळे मराठवाड्यातही अनेक पिकांचं नुकसान झालं आहे. हरभरा, तूर, गहू, जोंधळा, करडी, सूर्यफूल या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाच्या झळा बसल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पुन्हा पाणी आलं आहे.

अवकाळी पावसाने उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी चिंतेत

हवामानातील बदलांमुळे अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात द्राक्ष, कांद्यासह रब्बी पिकांनाही फटका बसणार आहे. ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष कांद्यावर करपा, मावा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. आणखी काही दिवस असंच वातावरण राहिलं तर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER