
महाराष्ट्रासह देशभरात शेतकरी म्हणायचे कुणाला याबद्दल निरनिराळ्या व्याख्या आहेत. शेतकरी म्हणावे कुणाला याची रोखठोक व्याख्या मांडली ती महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी, १९३२ ला. ज्याचे संपूर्ण कुटुंब शेती व्यवसायात आहे, त्यालाच शेतकरी म्हणावे. अशी व्याख्या त्यांनी केली. अस्पृश्य निवारण आणि समाजकार्यात पुढाकार घेणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या लिखाण आणि कार्यामुळं दलित मुक्ती आणि अस्पृश्यता निवारणाचा पाया रचला गेला होता.
शिक्षण
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे पणजोबा राणोजी शिंदे हे विजापूरच्या सुरापूर गावचे जाहगीरदार होते. नंतर विठ्ठल रामजींचे आजोबा बसप्पा यांनी रामजींनी कारकुनीचे शिक्षण दिले. हे शिक्षण पूर्ण झाल्यावर रामजींना बिद्री गावी शिक्षक पदावर नेमणूक झाली. रामजी शिंदे हे तापट स्वभावाचे शिक्षक असल्यामुळं जमखिंडीच्या श्रीमंतांनी त्यांना कारकुन खात्यात नोकरी लावली.
विठ्ठल रामजी शिंदेंनी वयाच्या सहाव्या वर्षी शाळेत प्रवेश घेतला. १२ व्या वर्षापर्यंत पाचवीपर्यंतचे शिक्षण पुर्ण करुन त्यांनी १९८५ ला इंग्रजीशाळेत प्रवेश घेतला आणि त्याच वर्षी त्यांच्या वडिलांचे हदयविकाराने निधन झाले. पुढं १८९२ला मॅट्रीकची परिक्षा पास झाल्यानंतर त्यांना जमखंडीच्या शाळेत नोकरी मिळाली. जमखिंडींच्या श्रीमंतांची इच्छा होती की त्यांनी गुरांचे डॉक्टर बनावं म्हणून मुंबईच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्कॉलरशीप त्यांना दिली. पण ही स्कॉलरशीप विठ्ठल शिंदेंनी नाकारली म्हणून त्यांना तीन महिन्यातच नोकरी सोडावी लागली.
पुण्याकडे रवाना
जमखंडीतली शिक्षकाची नोकरी सोडल्यानंतर शिंदे यांनी सरळ पुणे जवळ केले. पुण्यात पोहचल्यावर डेक्कन मराठा असोसिएशनचे संस्थापक व सचिव गंगाराम भाऊ म्हस्के यांच्याकडून दहा रुपयांची प्रतिमाह स्कॉलरशीप मिळवत कॉलेजात प्रवेश घेतला.
फर्ग्यूसनला शिकत असताना त्यांनी चर्चा मंडळाची स्थापना केली. १८९३ ते १९९८ ला विठ्ठलजी एकदा इंटर आणि एकदा बी.ए. ला नापास झाले. या दरम्यान त्यांनी चर्चामंडळाची स्थापना केली होती. यातून विविध विषयावर चर्चा ते घडवून आणायचे. विठ्ठलजींच्या सामाजिक कार्याला याच दिवसात सुरुवात झाली होती.
प्रार्थना समाजाशी संबंध
१८९५ ला पुण्यात अखिल भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशन भरले होते. या अधिवेशनात विठ्ठल रामजी हे स्वयंसेवक होते. या राष्ट्रीय सभेत एकेश्वर धर्मपरिषदेचे रेव्हरंड डॉ. जे. टी. संडरलँड यांचे धर्माविषयी उद्दात विचार ऐकून त्यांनी प्रार्थाना समाजाचा सदस्य होण्याचा निर्णय घेतला. १८९८ला प्रार्थना समाजाची रितसर दिक्षा त्यांनी साताऱ्यात घेतली. यानंतर अस्पृशांसाठी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
प्रार्थना समाजाचे धर्मप्रचारक म्हणून काम करायला सुरुवात
मुंबई येथील प्रार्थनासमाज व कोलकात्याचा ब्राह्मो समाज यांनी शिंदे यांची शिफारस केल्यावर ब्रिटिश अॅण्ड फॉरिन असोसिएशनने त्यांची ऑक्सफर्ड येथील मँचेस्टर कॉलेजात धर्मशिक्षणासाठी निवड केली. १९०१ ते १९०३ ही दोन वर्षे त्यांनी मँचेस्टर कॉलेजात तौलनिक धर्मशास्त्र, पाली भाषा व बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्मसंघाचा इतिहास, समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला.
भारतात येण्यापूर्वी १९०३ च्या सप्टेंबरमध्ये अॅमस्टरडॅम येथे भरलेल्या त्रैवार्षिक आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेस ब्राह्मो समाजाचे भारतातील प्रतिनीधी म्हणून उपस्थित राहून ‘हिदुस्थानातील उदारधर्म’ या विषयावरील निबंध त्यांनी सादर केला. १९०३ च्या अखेरीस मुंबई प्रार्थनासमाजाचे धर्मप्रचारक म्हणून त्यांनी कार्यास आरंभ केला.
शेतकरी, कामगारांसाठी कार्य
विठ्ठलजींच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळींमध्ये सहभाग घेतला. १९२०च्या मुंबई कौन्सिलच्या निवडणूकीत पुण्यातून मराठा समाजासाठी राखीव असलेल्या जागेत त्यांनी निवडणूक लढावी अशी त्यांच्या अनूयायांची मागणी होती. त्यांना जातीय तत्व मान्य नसल्यामुळं बहूजनपक्षाची स्थापना केली. त्यांनी ही निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला पुढं या पक्षानं कामगार, शेतकरी, शिपाई, मजूर, दुकानदार यांच्यासाठी भरीव कामगिरी केली.
१९११ला त्यांनी ‘मुरळी प्रतिबंधक परिषद’ भरवली. १९२६ ते १९३२ पर्यंत शेतकरी परिषदांमध्ये समस्या निवारणासाठी शेतकरी आणि कमगार एकीसाठी त्यांनी काम केलं.
अस्पृश निवारणासाठी स्वतःला झोकून दिले
१९०५ साली त्यांनी ‘इंडीयन सोशल रिफॉर्म’ हा लेख लिहला. १९०८ला त्यांनी बहिष्कृत भारत, अस्पृश्यता निवराणाचा इतिहास १९२२ आणि १९३३ला ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ या विषयावर सामाजशास्त्रीय दृष्टीकोनातून त्यांनी केलेल्या लिखाणामुळं दलितांच्या अवहेलनेबद्दल जागृती होवून दलित मुक्ती चळवळीचा पाया रोवला गेला.
अस्पृशता निवारण आणि या वर्गाच्या विकासासाठी विठ्ठलजींनी केलेल्या कार्यासाठी त्यांचा ‘कर्मवीर’ आणि ‘महर्षी’ या उपाधींनी त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला गेला.
समाज कार्यात झोकून दिल्यामुळं त्यांचे आरोग्याकडं मोठ्याप्रमाणात दुर्लक्ष झालं होतं. १९३५ पासून ते वेगवेगळ्या आजारांनीग्रस्त होते. १९४३ त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. पुण्यात २ जानेवारी १९४४ ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला