अमेरिकेतील नोकरी सोडून सुरू केली डेअरी ! १२० कर्मचारी अन् ४४ कोटींची उलाढाल

Maharashtra Today

हैदराबाद :- किशोर इंदूकुरी (Kishore Indukuri) यांनी अमेरिकेतील नोकरी सोडून डेअरी सुरू केली. आज त्यांच्याकडे १२० कर्मचारी असून त्यांची उलाढाल ४४ कोटी (120 employees and a turnover of Rs 44 crore)आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत (खरगपूर) येथून पदवी मिळवल्यावर किशोर यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मॅसॅच्युसेटसमधून पदव्युत्तर पदवी आणि पॉलिमर सायन्स आणि इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी मिळवली. त्यांना ‘इंटेल’मध्ये नोकरी मिळाली. सहा वर्षे नोकरी केल्यानंतरही त्यांचे तिथे मन लागत नव्हते.

भारतामध्ये त्यांच्या कुटुंबाच्या मालकीची कर्नाटकमध्ये शेती आहे. सुटीत भारतात आले की किशोर नेहमी शेतात यायचे आणि शेतकऱ्यांशी चर्चा करायचे. मग त्यांनी नोकरी सोडून देऊन शेती या त्यांच्या मूळ व्यवसायात लक्ष घालायचे ठरवले.

ते म्हणालेत, हैदराबादला परतल्यावर मला जाणवले की, परवडणाऱ्या आणि भेसळ न केलेल्या दुधाला फारच मर्यादित पर्याय आहेत. मला बदल घडवायचा होता तो फक्त माझा मुलगा आणि माझ्या कुटुंबापुरताच नाही तर हैदराबादेतील लोकांसाठीही.

इंदुकुरी यांनी २०१२ मध्ये कोईम्बतूर येथून २० गायी घेतल्या व हैदराबादमध्ये डेअरी फार्म उभा केला. किशोर हैदराबाद शहरातील ग्राहकांना थेट दूध पुरवतात. २०१६ मध्ये ‘सिद फार्म’ या नावाने ब्रँड नोंदवला. आता त्यांच्याकडे १२० कर्मचारी असून ते १० हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना दूध पुरवतात. गेल्या वर्षी यातून त्यांनी उलाढाल ४४ कोटी रुपये होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button