आज दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर बंद, भक्तांना ऑनलाईन दर्शन घेण्याचे आवाहन

dagdusheth - Maharastra Today

पुणे : पुण्यामध्ये मोठया प्रमाणात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज संकष्टी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. आज सकाळी मंदिरात फक्त धार्मिक विधी करण्यात आल्या. त्यामुळे गणेश भक्तांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी केले आहे.

दर महिन्याला संकष्टी चतुर्थीला शहर व उपनगरांतून हजारो भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून आज मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना आज मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. संकष्टी चतुर्थीसह इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. त्याकरीता https://seva.dagdushethganpati.com fasttrack यावर नोंदणी करावी.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button