वडिलांच्या कर्मामुळे सर्व मिळेल पण, आदर स्वतः कमवावा लागेल – कंगना रनौत

Kangana Ranaut - CM Uddhav Thackeray

मुंबई : सध्या अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) आणि शिवसेनेतील (Shiv Sena) वाद अधिकच चव्हाट्यावर आला आहे. महापालिकेकडून केल्या गेलेल्या कारवाईमुळे संतापलेल्या कंगनाने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले आहे. “वडिलांच्या चांगल्या कर्मामुळे तुम्हाला संपत्ती मिळेल पण आदर हा तुम्हाला स्वत:ला कमवावा लागेल”, असा टोला अभिनेत्री कंगना रणौतने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला.

“तुमच्या वडिलांचे चांगले कर्म तुम्हाला संपत्ती देऊ शकतात, पण आदर तुम्हाला कमवावा लागेल. तुम्ही माझं तोंड बंद कराल, पण माझा आवाज माझ्यानंतर शंभर आणि लाखोंमध्ये प्रतिध्वनित होईल. तुम्ही किती लोकांचे तोंड बंद कराल? किती लोकांचा आवाज दाबणार? सत्यापासून कधीपर्यंत पळणार? तुम्ही घराणेशाहीच्या एका नमुन्याशिवाय काहीच नाही,” अशा शब्दांत कंगनाने उद्धव ठाकरेंवर टीका केली. त्याचसोबत आपल्याला अनेक मराठी मित्रमैत्रिणींचा पाठिंबा मिळत असल्याचं कंगनाने सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER