दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे रंगला ठाणे विरुध्द ऑस्ट्रेलिया असा क्रिकेट सामना

Thane against Australia cricket match

ठाणे  :- ठाण्यातील दादोजी कोंडदेवक्रीडाप्रेक्षागृह येथे क्रिकेटपटूंसाठी आंतरराष्ट्रीयदर्जाची खेळपट्टी तयार करण्यात आली आहे.अनेक वर्षानी या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया विरुध्दठाणे हा सराव सामना रंगला. हा सराव सामनापाहण्यासाठी क्रिकेट रसिकांनी मोठी गर्दी केलीहोती. 16 वर्षाखालील गटात झालेला क्रिकेटचासामना क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरली. या सरावसामन्यात ठाणे सेंटर संघ 3 गडी राखून विजयीझाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यामाध्यमातून एकदिवसीय क्रिकेट सामन्याचेआयोजन करण्यात आली असल्याची माहितीक्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी दिली.

दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृहातीलखेळपट्टी ही आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यातआली आहे. या खेळपट्टीवर खेळण्याचा सरावव्हावा यासाठी या एकदिवसीय क्रिकेट सरावसामन्याचे आयोजन करण्यात आले होते.ठाण्यातील ठाणे सेंटर संघ विरुध्द ऑस्ट्रेलियाअसा 35 षटकांचा सराव सामना आज दिनांक15 एप्रिल, 2019 रोजी रंगला. हा सराव सामनापाहण्यासाठी ठाणेकर क्रिकेटप्रेमींनी गर्दी केलीहोती. दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृह येथे तयारकरण्यात आलेली धावपट्टी ही उत्तम दर्जाचीअसून याची माहिती ऑस्ट्रेलिया येथे देणारअसल्याचे ऑस्ट्रेलिया 16 वर्षाखालील संघाचेप्रशिक्षक ब्रूस वूड (Bruce Wood) यांनीनमूद केले.

ही बातमी पण वाचा : विश्वचषक स्पर्धेसाठीचा भारतीय क्रिकेट संघ जाहीर