दाढी-मिशांचे केस काळे करण्यासाठी करा ‘हे’ उपाय…

gents

सध्या दाढी-मिशा ठेवण्याचा फॅशन सुरु आहे. विराट कोहली, रणवीर सिंह यांच्याप्रमाणे स्टायलिश दाढी-मिशा ठेवण्याला तरुण प्राधान्य देतात. दाढी-मिशा ठेवायच्या तर त्यांची काळजी घेणं हे आलंच. मग महागडी प्रोडक्ट्स विकत घेणं, पैसे घालवणं आलं. पण मित्रांनो, काही घरगुती उपयांनी दाढी-मिशांची नजाकत टिकवून ठेवता येते. यासाठी काही पदार्थांचा आहारात समावेश करावा. काही उपाय आजमावावेत.

  • तुळशीची पानं कांद्यांच्या रसात मिसळून हे मिश्रण लावल्याने दाढी-मिशा पांढर्‍या होत नाही.

  • कच्ची पपई वाटून त्यात चमचाभर हळद, कोरफडीचा रस घाला. या मिश्रणामुळे दाढी-मिशा मुलायम आणि काळ्या राहतात.

  • कढीपत्ता घालून पाणी उकळा. हे पाणी दाढी-मिशांना लावा. केस पांढरे होत नाहीत.

  • खोबरेल तेलात कढीपत्ता घालून हे मिश्रण उकळून घ्या. या तेलाने दाढी-मिशांना रोज मसाज करा. केस काळे राहतील.

  • आवळ्याची पूड, खोबरेल तेल उकळून घेऊन ते दाढी-मिशांना लावा.

  • जवसातल्या ओमेगा 2 फॅटी अॅसिडमुळे दाढी-मिशांचे केस काळे राहतात. त्यामुळे जवस दररोज खायला पाहिजे.

  • तुरटी आणि गुलाबजलचं मिश्रण मिशी आणि दाढीच्या केसांना लावल्यास केसांचा रंग परत मिळवता येतो. यासाठी तुरटी आणि गुबालजल मिश्रित करुन दाढीच्या केसांवर लावा.

  • बटाटे आणि डाळीची पेस्ट पांढरे केस दूर करण्यात फायदेशीर ठरतात. बटाट्यामध्ये ब्लीचिंगचे नैसर्गिक गुण असतात. त्यामुळे डाळीमध्ये बटाट्याची पेस्ट टाकून केसांना लावल्यास केसांचा नैसर्गिक रंग पुन्हा येतो.