अभिनेता सुशांत सिंह राजपूतला दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Dadasaheb Phalke Award announced for actor Sushant Singh Rajput

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award) जाहीर करण्यात आला आहे . दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील मनाचा पुरस्कार समाजाला जातो . दादासाहेब फाळके अवॉर्ड या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवरुन ही माहिती देण्यात आली आहे.

सुशांत सिंह राजपूतला अभिनय क्षेत्रात त्याला जो सन्मान आणि प्रेम हवां होता, तो त्याला मृत्यू नंतर मिळत आहे. २०२१ च्या दादासाहेब फाळके आंतराराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार महोत्सवात सुशांतला सन्मानित केलं जाणार आहे. मात्र या पुरस्काराची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

दरम्यान १४ जून रोजी सुशांतने वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेवून आपला जीवन प्रवास संपवला.मात्र सुशांतची हत्या करण्यात आली की आत्महत्या याबाबत तपास सुरूच आहे . या प्रकरणी आता सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तीन यंत्रणा तपास करत आहेत. याप्रकरणातील अनेक नवे बारकावे समोर येत आहे. सुशांतच्या कुटुंबाने त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप लावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER