अभिनेता रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; प्रकाश जावडेकर यांची घोषणा

Rajnikant-Maharashtra Today

नवी दिल्ली : ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत (Rajnikant)यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Phalke Award)जाहीर झाला आहे. अभिनय क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर झाल्याने त्यांच्यावर चहुबाजूने अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडसह दाक्षिणात्य मनोरंजन विश्वात रजनीकांत यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान पटकावले आहे. सुपरस्टार रजनीकांत यांचा ५१ व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करणार आहे. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी घोषणा केली.

यंदाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करताना प्रकाश जावडेकर म्हणाले की, “देशातील सर्व भागातील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.”

२५व्या वर्षी कारकिर्दीची सुरुवात!

जनीकांत यांना चित्रपटसृष्टीतील सर्वात पहिला ब्रेक १९७५मध्ये वयाच्या २५व्या वर्षी मिळाला. ‘अपूर्व रागंगल’ कमल हसन यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रजनीकांत यांना केवळ १५ मिनीटांची भूमिका मिळाली होती. शाळेपासूनच रजनीकांत यांना अभिनयाची आवड होती. शाळेतील अनेक नाटकांमधून त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली. रावणाची व्यक्तिरेखा साकारायला त्यांना फार आवडायचे.

चित्रपटसृष्टीत येण्याआधी रजनीकांत ‘बेंगळुरू मेट्रॉपॉलिटीन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन’मध्ये ‘कंडक्टर’ म्हणून कामाला होते. चित्रपटाच्या कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी रजनीकांत घराजवळच्या रामा हनुमान मंदिरात स्टंट्सची प्रॅक्टिस करत असत. रजनीकांत यांचा सीबीएसई अभ्यासक्रमात उल्लेख आहे. कमल हसन यांचे मोठे चाहते आहेत.

हिमालय ‘ब्रेक’

प्रत्येक चित्रपटानंतर रजनीकांत काही काळासाठी ब्रेक घेऊन हिमालयात जातात. त्यांच्या प्रत्येक भेटीत ऋषिकेश येथील हॉटेलमध्ये त्यांची नेहमीची ठरलेली खोलीच त्यांना दिली जाते. १९७८ साली आलेल्या ‘भैरवी’ या चित्रपटाने रजनीकांत यांना थेट सुपरस्टार पदावर नेले. या चित्रपटाची इतकी चर्चा झाली की दिग्दर्शक एम. भास्कर यांनी रजनीकांत यांचे ३५ फूटांचे पोस्टर चेन्नईमध्ये लावले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button