दादर-म्हैसूर साप्ताहीक एक्स्प्रेस धावणार

Dadar-Mysuru Weekly Express will run

मुंबई : दादर-म्हैसूर दरम्यान नवीन साप्ताहीक एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहे. दादर येथून दि. ११ फेब्रुवारी तर म्हैसूर येथून दि. १४ फेब्रुवारी पासून या एक्स्प्रेसला प्रारंभ होणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. रेल्वे मंत्रालयाकडून उत्तर आणि दक्षिण भारतात टप्प्याटप्प्याने रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येत आहे. यापूर्वी कोयना, महाराष्ट्र, महालक्ष्मी, यशवंतपूर निजामुद्दीन एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या आहेत. तर दादर-पाँडिचरी आणि दादर-तिरुनेलवेल्ली एक्स्प्रेसही लवकरच सुरू होणार आहेत.

दादर-म्हैसूर विशेष साप्ताहीक एक्स्प्रेस सुरू होत असून ती १४ फेब्रुवारीपासून धावणार आहे. या एक्स्प्रेसला कल्याण, पुणे, सातारा, कराड, सांगली, मिरज, कुडची, घटप्रभा, बेळगाव, लोंढा, अलनवर, धारवाड, हुबळी, हावेरी, रानीबन्नूर, हरिहर, दावणगिरी, बिरूर, कडूर, अर्सिकेरी, हसन, होल नरसीपूर आणि कृष्णराजनगर इत्यादी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER