दादा लढवय्ये आहेत, कोरोनातून लवकर बरे होऊन येतील – सुप्रिया सुळे

Adjit Pawar-Supriya Sule

मुंबई :- उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असून त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अजित पवार यांना कोरोना झाल्याचे कळल्यानंतर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्यावि,यी चिंता व्यक्त केली व त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

अजित पवार यांच्या भगिणी आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही दादा लवकर बरे व्हा असे ट्विट केले आहे.

अजितदादा कोरोना पॉझिटिव्ह असल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाले आहेत. दादा लढवय्ये आहेत. महाराष्ट्रातील जनतेचे आशीर्वाद आणि शुभेच्छा यांच्या बळावर कोरोना आजाराला पराभूत करुन लवकरच सर्वांच्या सोबत येतील. दादा,लवकर बरे व्हा” असे ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यावेळी ती निगेटिव्ह आली होती. मात्र कणकण आणि ताप असल्याने ते घरीच थांबून विश्रांती घेत होते. रुटीन चेकअपसाठी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात गेले असता त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर ते रुग्णालयात अॅडमिट झाले. (NCP MP Supriya Sule wishes speedy recovery to cousin Ajit Pawar who tested COVID Positive)

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती अजित पवारांनी ट्विटरवरुन दिली होती.

राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन, असेही त्यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : कार्यकर्त्यांनी घाबरु नये, अजित पवार लवकरच महाराष्ट्राच्या सेवेत रुजू होतील – अमोल मिटकरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER