दादाला हॉस्पिटलमधून मिळाली सुटी; डॉक्टर म्हणाले, ‘आता सगळं ठीक आहे !’

Sourav Ganguly

टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार सौरव गांगुलीला (Sourav Ganguly) छातीत दुखल्याच्या तक्रारीनंतर जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण आता तो बरा झाला आहे आणि घरी परतला आहे.

BCCI चे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुलीला रविवारी कोलकाताच्या अपोलो रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. डॉ. राणा दासगुप्ता यांनी तेथे उपस्थित माध्यमांना सांगितले की, “ते (गांगुली) पूर्णपणे ठीक आहेत.”

दादाची एंजिओप्लास्टी
देशातील नामांकित हृदयतज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी आणि डॉ. अश्विन मेहता यांच्यासह डॉक्टरांच्या पथकाने ४८ वर्षीय सौरव गांगुलीची २८ जानेवारी रोजी एंजिओप्लास्टी केली होती. त्याच्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील अडथळा दूर करण्यासाठी, आणखी दोन स्टेंट बसविण्यात आले होते.

एका महिन्यात दुसऱ्यांदा तक्रार
सौरव गांगुली २ जानेवारीला जिमच्या ट्रेडमिलवर धावत असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्याला कोलकाताच्या वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ७ जानेवारीला त्याला या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर त्याने डॉक्टरांचे आभार मानले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER