आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात!, गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करत धनंजय मुंडे भावुक

Dhanajay Munde-Gopinath Munde

मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे(Gopinath Munde) यांची आज जयंती… विविध राजकीय पक्षाचे नेते त्यांना अभिवादन करत आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंत्री धनंजय मुंडे(Dhananay Munde) यांनी ट्विट करुन आप्पा अर्थात गोपीनाथ काकांना अभिवादन केलं आहे.

“आप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन”, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पवार साहेब.. एक नाव नाही ती एक कारकीर्द आहे, एक मोहीम, एक वसा आहे, अशा शब्दात त्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

“राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या माझ्यासारखा लाखो तरुणांसाठी एक दिशा आहे, आदरणीय पवारसाहेबांना 80व्या जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा. आपणास दीर्घायुष्य लाभो हीच प्रभू वैद्यनाथास प्रार्थना. #Yodhaat80”, असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER