लालबाग येथे सिलेंडरचा भीषण स्फोट, 16 जण जखमी

Gas Cylinder Explosion - गॅस सिलेंडर स्फोट

मुंबई : मुंबईच्या लालबाग इथं साराभाई इमारतीतील बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट (Gas Cylinder Explosion) झाला आहे. या भीषण स्फोटामध्ये तब्बल 16 जण जखमी झाले असून त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लालबाग इथे गणेश गल्ली परिसरातील साराभाई इमारतीत आज सकाळी 7.50 च्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या एका बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गॅस गळती होत होती. याबद्दल स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर गॅस गळतीचा वास कुठून येतो हे पाहण्यासाठी स्थानिक आणि अग्निशमन दलाचे अधिकारी इमारतीत गेले असता अचानक स्फोट झाला.

आगीचा अचानक भडका उडाल्यामुळे 16 जण जखमी झाले आहे. यात 3 महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे. जखमींपैकी काही जणांवर केईम अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तर चार जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले आहे. पण नेमकी गॅस गळती का झाली, हे अद्याप मात्र कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी केईम रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER