‘यास’ चक्रीवादळाचा मिदनापूर, २४ परगणाला धोका; ममता बॅनर्जी रात्रभर थांबणार नियंत्रण कक्षात !

Mamata Banerjee - Yaas Cyclone

कोलकाता :- भारताच्या पूर्व किनारपट्टीवर घोंघावणाऱ्या ‘यास’ चक्रीवादळाचा (Cyclone Yaas) सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. एनडीआरएफ, कोस्ट गार्डसह भारतीय नौदलानेदेखील कंबर कसली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आज (मंगवार) रात्री, या वादळावर नजर ठेवून असलेल्या नबाना येथील नियंत्रण कक्षातच थांबणार आहेत.

ओडिशामधल्या धामरा बंदर परिसरात ‘यास’ घुसणार असले तरी त्याचा फटका वर पश्चिम बंगालच्या किनारी भागांनादेखील बसणार आहे. बुधवारी २६ मे रोजी सकाळी ‘यास’ चक्रीवादळ ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यांवर धडकणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. यावेळी वादळाचा वेग १८५ किलोमीटर प्रतितास असेल.

वादळाचा सामना करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये ५४ हजार अधिकारी आणि कर्मचारी, दोन  लाख पोलीस-होमगार्ड, एनडीआरएफ आणि कोस्ट गार्डच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर्व मिदनापूर जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज आहे. त्यासोबतच उत्तर परगणा आणि दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांनादेखील वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा सामना करावा लागणार आहे. कोलकाता, हावडा आणि हुगळी या शहरांमध्येदेखील चक्रीवादळाचा परिणाम दिसून येईल. ओडिशामधील जगतसिंहपूर, केंद्रापारा, भद्रक, बालासोर आणि पश्चिम बंगालमधल्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यातून जाताना हे वादळ टप्प्याटप्प्याने १५५ किमी प्रतितास, १६५ किमी प्रतितास आणि शेवटी १८५ किमी प्रतितास वेग घेईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button