चक्रीवादळग्रस्तांना मिळणार ठाकरे सरकारकडून २५० कोटींची मदत; वडेट्टीवारांची माहिती

Vijay Vadettiwar

मुंबई :- तोक्ते चक्रीवादळामुळे (Cyclone Tauktae) सागरी किनाऱ्यावरील जिल्ह्यांना तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. या चक्रीवादळग्रस्तांसाठी २५० कोटी रुपयांचे पॅकेज (250 crore package) जाहीर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबत शासन उद्या निर्णय जाहीर करणार आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी दिली आहे.

वडेट्टीवार यांनी सांगितले की, “सात जिल्हांत चक्रीवादळाचा परिणाम झाला. एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘तोक्ते’ चक्रीवादळात ७२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पण राज्य सरकारने २५० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये विजेच्या भूमिगत वायर टाकले जातील, निवारेही बांधले जातील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली आहे. सोबतच या सर्व कामांची आवश्यकता वर्तवली असून त्यांचे प्रस्ताव मागवले आहेत.”

दरम्यान, २१ मे रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः कोकण (Konkan) दौरा केला आणि नुकसानीचा आढावा घेतला. तात्पुरती घोषणा न करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल आणि कोणालाही वंचित ठेवणार नाही, असे त्यांनी आश्वस्त केले होते. तसेच, आज चक्रीवादळग्रस्तांसाठी २५० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button