‘तौक्ते’ चक्रीवादळाने दिशा बदलली, कोकणात धडकले; रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान

Cyclone 'Tauktae' - Maharashtra Today

गोवा :- अरबी समुद्रात तयार झालेलं चक्रीवादळ दिशा बदलत गोव्यानंतर कोकणात धडकलं आहे. तौक्ते चक्रीवादळ हे अखेर धडकलं असून, कोकण किनारपट्टी भागात याचे परिणाम दिसून येत आहेत. रत्नागिरी, देवबाग, मालवण या भागांमध्ये ताशी ८०-९० किमी वेगाने सोसाट्याचे वारे वाहात आहेत. वाऱ्याची ताकद इतकी आहे की, यामध्ये उभं राहणंही कठीण झालं आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने मोठमोठी झाडं रस्त्यावर मुळासकट उखडून फेकली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

अनेक ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या असून, मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून कर्नाटकात चौघांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेलं चक्रीवादळ तौक्ते गुजरातच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहे. कर्नाटक राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीप्रमाणे तौक्ते चक्रीवादळामुळे चार नागरिकांना प्राण गमवावे लागले असून, ७३ गावांमध्ये चक्रीवादळामुळे नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे कर्नाटकातील सहा जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला. यात किनारपट्टी भागातील तीन, तर इतर जिल्ह्यांचा समावेश आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेऊन आढावा घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button