निसर्ग’ चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकले

cyclone-nisarga-hit-coastal-areas-of-konkan-region

मुंबई :- एकीकडे महाराष्ट्र कोरोना संकटाचा सामना करत आहे तर दुसरीकडे राज्यावर नैसर्गिक संकट ओढवले आहे. कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रावर निसर्ग नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका हा मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीला बसणार आहे.

ही बातमी पण वाचा : निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागला धडकलं, वाऱ्यामुळे घरांचे छपरं उडाली

आता चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ श्रीवर्धन, दिवेआगर येथे हे धडकले आहे. चक्रीवादळाच्या केंद्रबिंदूचा परीघ ६० किलोमीटर इतका मोठा आहे. वादळ किनाऱ्यावर धडकताना (लँडफॉल) वाऱ्याचा वेग १०० किलोमीटर प्रतितास इतका वेगवान असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. चक्रीवादळ वेगाने ताशी ५५ किमी वेगाने मुंबईच्या दिशेने सरकत आहे. या वादळामुळे कोकण किनारपट्टी प्रभावित झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER