चक्रीवादळाचा संभाव्य धोका, मुख्यमंत्री ठाकरे, गृहमंत्री अमित शहा यांच्यात चर्चा, सावधगिरी बाळगण्याच्या सुचना

amit-shah-uddhav thackeray

मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर उद्या (बुधवार 3 जून रोजी) निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.

व्हिडिओ कॉन्फरन्स दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितले की मुंबई शहर, मुंबई उपनगरे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांना सतर्कता देण्यात आली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग सायक्लोननिसार्गाला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

दरम्यान, चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्य.मंत्र्यांना मदतीचे आश्वासन दिले.मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळास तोंड देण्यासाठी राज्याचा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग पूर्णपणे तयारीत आहे. मच्छिमारांनाही समुद्रातून बोलावून घेण्यात आले असून जीवित हानी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर या संदर्भात चर्चेदरम्यान संभाव्य चक्रीवादाळाला तोंड देण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. वेळ पडल्यास मदत आणि बचाव कार्यासाठी आजूबाजूच्या काही राज्यातील राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या काही तुकडयाही तयार ठेवण्यात आल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. या चक्रीवादळात मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या १६ तुकडयांपैकी १० तुकडया तैनात करण्यात आल्या असून एसडीआरएफच्या सहा तुकडया राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

विशेषत: वीज पुरवठा खंडीत होणार नाही तसेच पालघर आणि रायगडमधील रासायनिक कारखाने, अणूऊर्जा प्रकल्प याठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. मंत्रालयात देखील २४ तास नियंत्रण कक्ष सुरु असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कच्चा घरात राहत असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे.

या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईकरांनीही आवश्यक ती खबरदारी आपल्या स्तरावर बाळगावी, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER