लॉकडाऊनमधील ‘सायकल गर्ल’चे पितृछत्र हरवले; डबलसीट घेऊन केला होता १२०० कि.मी. प्रवास!

दरभंगा : गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात (Corona Lockdown) स्थलांतरित मजुरांसमोर घरी जाण्याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. मजूर मिळेल त्या साधनाने हजारो मैलांचा प्रवास करून घरी जात होते. अनेक जण तर पायी घरी गेले होते! अशा अनेक घटनांमध्ये लक्ष वेधून घेतले होते बिहारमधील दरभंगा येथील ज्योती पासवान या मुलीने. तिने वडिलांना सायकलवर बसवून डबलसीट १२०० कि. मी. प्रवास केला होता. ती ‘सायकल गर्ल’ (Cycle Girl) म्हणून प्रसिद्ध झाली होती. या सायकल गर्लचे वडील मोहन पासवान (Mohan Paswan) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

कोरोनाच्या त्या पहिल्या लॉकडाऊनमध्ये सर्व बंद होते. लाखो कामगार – मजूर पायी किंवा मिळेल त्या वाहनाने घरी निघाले होते. त्यात ज्योतीदेखील होती. दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडा ब्लॉकमधील सिरहूली खेड्यातील १३ वर्षांची ज्योती तिच्या वडिलांना सायकलवर बसवून गुडगावहून आठ दिवसांत दरभंगा येथे आली होती. हे अंतर सुमारे १२०० कि. मी. आहे. आज ज्योतीचे वडील तिला कायमचे सोडून गेलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button