शिक्षक सहकारी बँकेत 25 लाखाचा सायबर दरोडा

Cyber crime

नागपूर:  बदलत्या काळानुसार गुन्हेगारीचे स्वरूपही बदलत चालले आहे… अशिक्षित गुन्हेगाराची जागा तंत्रज्ञ , इंजिनिअर घेत आहे.. चाकू, सुऱ्या विना लुटमार ,दरोडा टाकता येतो…असाच काहीसा प्रकार नागपूर येथील शिक्षक सहकारी बँकेत घडल्याचे उघडकीस आले आहे.. येथे बँकेचे खाते हँक करून, वेगवेगळ्या बँकेच्या खात्यात ऑनलाइन तब्बल 30लाख वळते करुन, शिक्षक सहकारी बँकेला 25 लाखाचा गंडा घालण्यात आला आहे.या सायबर दरोड्याने येथे एकच खळबळ उडाली आहे.

ही बातमी पण वाचा : जरीपटक्यात तडीपार गुंडाचा खून

19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीची सार्वजनिक सुटी असताना , कुणीतरी या बँकेचे खाते हँक केले व या बँकेच्या खात्याततून साऊथ इंडियन बँक न्यू दिल्ली येथील खातेधारक असरिफ खान, इंडुसन बँक भोपाल येथील खातेधारक रजनी शर्मा , ए.जी.प्लास्टिक इंडस्ट्रीज दिल्ली , युनियन बँक ऑफ इंडिया न्यू दिल्ली येथील खातेधारक शाईन शाबरा , वरूण गुप्ता न्यु दिल्ली व विजय सोना कोटक महेंद्र बँक पुणे शहर मागे यांच्या खात्यात परस्पर 30 लाख 13 हजार 170 रुपये वळते करण्यात आले. असा मँसेज शिक्षक सहकारी बँकेचे जनरल मँनेजर विनोद लोहकरे यांच्या मोबाईलवर आला. बँकेला सार्वजनिक सुटी असताना व बँकेत व्यवहार करण्यासाठी कुणीही हजर नसताना एवढा मोठा व्यवहार कुणी केला ? असा प्रश्न त्यांना पडला व त्यांनी तात्काळ बँक गाठली व दुसऱ्या बँकेतील खात्यात वळत होणाऱ्या 30 लाखापैकी 10 लाख थांबविण्याचा प्रयत्न केला. यात 5 लाख बँकेच्या खात्यात परत आले.पण 25 लाख गेले.चौकशी दरम्यानबँकेचे खाते हँक करून परस्पर दुसऱ्या बँकेतील खात्यात पैसे वळते करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

या प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

विनायक पुंड