शीतल आमटेंच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यास सायबर तज्ज्ञांना अपयश; आत्महत्येचे गुढ कायम

dr. sheetal amte - Maharastra Today

चंद्रपूर : समाजसेवक बाबा आमटे यांची नात डाॅ. शीतल आमटे (DR. Sheetal Amte) यांनी काही महिन्यांपूर्वी राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. शीतल महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या. या आत्महत्येला ४ महिने झाले, तरी पोलिसांना गुंता सोडवण्यात यश आले नाही. शीतल आमटे यांच्या टॅबचा पासवर्ड शोधण्यात सायबर तज्ज्ञांनादेखील अपयश आले आहे.

मागील वर्षी ३० नोव्हेंबर रोजी डाॅ.शीतल आमटे यांनी विषारी इंजेक्शन टोचून आयुष्य संपवले. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी केली. तपासात पोलिसांनी त्यांच्या इलेक्ट्राॅनिक वस्तू ताब्यात घेतल्या. यात २ मोबाईल, लॅपटाॅप आणि टॅब जप्त केले. मुंबई पोलिसांच्या सायबर टीमला टॅबचा पासवर्ड शोधता आला नाही. शीतल आमटे यांनी टॅबला EYE पासवर्ड ठेवला होता.

सायबर टीमला टॅबचा पासवर्ड शोधता आले नसल्याने या वस्तू पुण्याच्या सेंट्रल फाॅरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आल्या आहेत. या टॅबच्याआधारे पोलिसांना आत्महत्येमागील गुंता सोडवण्यास मदत होण्याची शक्यता आहे. मोबाईल आणि लॅपटाॅपमधील डेटा पुर्णपणे काढला नसल्याची शंका पोलिसांना आहे. त्यामुळे मोबाईल आणि लॅपटाॅपचीही पुन्हा पडताळणी करण्यात येऊ शकते.

दरम्यान, शीतल आमटे यांनी घेतलेल्या विषारी रसायनाबद्दल अद्याप तपास पुर्ण झालेला नाही. तर पोलीस अजूनही रासायनिक रिपोर्टच्या प्रतिक्षेत आहेत. तर शीतल आमटे यांनी नैैराश्यातून आत्महत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, अजूनही शीतल आमटे यांच्या आत्महत्येचे गुढ कायम आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button