सोलापुरात सलून व ब्युटी पार्लर सुरू होणार

Salon

सोलापूर : जिल्ह्यात कटिंग सलून व ब्युटी पार्लर सुरू करण्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. मात्र यासाठी काही अटी ठेवण्यात आल्या आहेत.

दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरू ठेवता येतील. ग्राहकांना नंबर देण्यासाठी दुकानाच्या बाहेर रजिस्टर असेल. ग्राहकाने रजिस्टरमध्ये नाव, पत्ता इत्यादी माहिती भरल्यानंतर त्यांना नंबर देऊन दुकानात येण्याची वेळ सांगण्यात येईल. एकाच ग्राहकाला दुकानात प्रवेश मिळेल व दुकानात ग्राहक आणि कारागीर असे दोघेच असतील याची काळजी घ्यावी. मोठ्या सलून किंवा ब्युटी पार्लरमध्ये दोन खुर्च्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर ठेवून एकापेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात प्रवेश देता येईल. कारागीर आणि ग्राहक दोघांनीही मास्क बांधणे आवश्यक आहे. मास्क न बांधल्यास ५०० रुपये दंड.

दुकानातील औजारे आणि साहित्याचे वारंवार निर्जंतुकीकरण करणे आवश्यक. एका ग्राहकासाठी वापरलेला टावेल दुसऱ्या ग्राहकासाठी वापरू नये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER