इंदोरीकर महाराजांना काळे फासणाऱ्या महिलेचे नाक कापू; मनसेचा इशारा

पुणे :- मुलगा आणि मुलीच्या जन्माबाबत खबळजनक विधान करणाऱ्या इंदोरीकर महाराजांना काळे फासण्याचा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला. यावर कोणाचेही नाव न घेता मनसेच्या पुणे महिला शहराध्यक्ष रूपाली ठोंबरे यांनी प्रतिइशारा दिला की, इंदोरीकर महाराजांना काळे फासणाऱ्या महिलेचे नाक कापू.

क्रिकेट आणि सचिन तेंडूलकरबद्दल बोरीस बेकर काय म्हणाला?

रूपाली म्हणाल्या की, इंदोरीकर महाराज समाजातील वाईट गोष्टींविरुद्ध प्रबोधन करत असतात. महाराजांनी अनेकांचे संसार मार्गी लावले आहेत. मात्र एका शूर्पणखा महिलेने, महाराजांविरुद्ध चार दिवसांत गुन्हा दाखल झाला नाही तर महाराजांना काळे फासू, अशी धमकी दिली आहे. रूपाली यांनी आव्हान दिले आहे की – तू ये. महाराजांना काळे फासण्याचा प्रयत्न कर. तुझे नाक कसे कापायचे हे आम्हाला माहीत आहे. कोणाच्या तोंडाला काळे फासले जाते ते दिसेल. खूप सहन केले. आता बस्स. स्त्री म्हणून कोणतीही चुकीची गोष्ट सहन करणार नाही. दरम्यान, या वादाबद्दल दिलगिरी व्यक्त करताना इंदोरीकर महाराज म्हणाले आहेत की, माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.