कोल्हापुरातील या गावात आजही पाळली जाते गाव सोडण्याची प्रथा

कोल्हापूर : ग्रामीण भागात रूढीपरंपरांचा जबरदस्त प्रभाव असल्याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापुरातील (Kolhapur) राधानगरी तालुक्याच्या दुर्गम भागात वसलेल्या चौके व मानबेट गावाची गावपळणीची परंपरा. आजही पूर्वपरंपरेनुसार दोन्ही गावे प्रपंच सोडून चक्क वेशीबाहेर पळाली आहेत. घरातील सर्व साहित्य सोडून मुलेबाळे, वृद्ध व जनावरांसह दोन्ही गावांनी माळावर प्रपंच थाटला आहे.

चौके व मानबेट वाडीवजा गावे कसवा तारळेपासून वीस किलोमीटरवर दुर्गम भागात आहेत. रासाईदवी ग्रामदेवता या गावात जवळपास १४० कुटुंबे राहतात. पिढ्याना सुरू असलेली व दर तीन वर्षांनी होणारी गावपळण प्रथा ग्रामस्थांनी आजही जोपासली आहे. पूर्वी गावात रोगराई आली असता गावाबाहेर जाऊन राहण्याची प्रथा होती. त्यानंतर ग्रामदेवतेचा कौल घेऊनच गावात प्रवेश केला जात होता. यालाच गावपळण म्हणतात.

रविवारपासून (२८ फेब्रुवारी) या दोन गावातील लोकांनी जंगलात आपल्या गुराढोरांसह सर्व पाळीव प्राणी सोबत घेऊन तळ ठोकला आहे. गेले आठ दिवस गावपळणीची पूर्वतयारी म्हणून मांडव घातले जात होते. अगदी घरातील कोंबडया, कुत्रे मांजरापासून दुभत्या जनावरांसह सर्व लवाजमा घेऊन गेले आहेत. मानबेट व चौके गावाना निर्मनुष्य वस्तीचे स्वरूप आले आहे. गाव पळणीदरम्यान गाव निर्मनुष्य असले तरी कुठेही चोरी होत नाही. तसेच घरातील धान्य किंवा शेतातील पिकांचे वन्यप्राण्यांपासून नुकसान होत नाही. रासाई देवीच्या महात्म्यामुळेच कोणालाही चोरी करणे शक्य नाही व गावपळणीच्या दिवसांमध्ये ग्रामस्थांची श्रद्धा आहे. मानबेट, चौके गावचे अन्य मानकरी, बलुतेदार ग्रामस्थांनी आज एकत्र येऊन गावपळणीची देवीकडून आज्ञा (हुकूम) घेतला. पाच, सात किंवा नऊ दिवसांनी पुन्हा कौल लावून देवीच्या हुकुमानुसारच गावभरणी होते. मात्र, देवीने कौल दिला नाही तर मात्र वेशीबाहेरचा मुक्काम वाढतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER