सध्या सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस यांच्या हा व्हिडीओ होतो आहे वायरल, चला बघूया काय आहे ह्यात खास

Devendra Fadnavis Video

“मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या पायाला चिकटलेली माती कधी निघाली नाही, आतासुद्धा जनतेसाठीचा कळवळा कसा स्वस्थ बसू देईल? जिथे – जिथे जनता संकटात तिथे तिथे देवेंद्र फडणवीस मैदानात… असे एका सामान्य व्यक्तीने व्हिडीओ ट्विट केले आहे.

त्या व्हिडिओत अभिनेते नाना पाटेकर यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना केलेल्या कामांची आणि वर्तनाची प्रशंसा केली आहे. नाना पाटेकर म्हणाले होते की, “मी बीजेपीचा नाही, पण देवेंद्र फडणवीस हा माणूस मोठा प्रामाणिक आहे. तो मुख्यामंत्र्यासारखा वावरत नाही, मुख्यमंत्री म्हणून माझा त्यांच्यावर विश्वास आहे.”

या संदर्भात उल्लेखनीय आहे की, गेल्या वर्षी कोकणात ‘निसर्ग’ वादळाने मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी फडणवीस यांनी लगेच नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता. यावर्षी पुन्हा कोकणाला ‘तौक्ते’ चक्रीवादळाने नुकताच तडाखा दिला आहे. यावेळीही फडणवीस यांनी विरोधीपक्षनेते म्हणून लगेच नुकसानग्रस्त भागाचा दोन दिवस दौरा करून पीडितांना धीर दिला. त्याचवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त भागाचा पाच तासात धावता दौरा केल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button