सध्या कॉग्रेसच्या अध्यक्ष्या सोनिया गांधीच राहणार, मात्र पक्षामध्ये युवा विरुद्ध जेष्ठ सामना

Sonia gandhi & Rahul Gandhi

नवी दिल्ली : कॉंग्रेसमध्ये (Congress) एकीकडे राहुल गांधींना (Rahul Gandhi) पुन्हा पक्षाध्यक्ष बनवण्याच्यामागणीवर युवा नेते आग्रही आहेत तर दुसरीकडे पक्षाने सोनिया गांधी (Sonia Gandhi) याच अध्यक्ष राहतील, असे स्पष्टीकरण दिले आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये युवा विरुद्ध जेष्ठ नेते असा, सामना रंगण्याची शक्यता आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी म्हटले आहे की, पक्षाध्यक्षपदाची निवड करण्यासाठी योग्य कार्यपद्धती होत नाही तोपर्यंत सोनिया गांधी अंतरिम अध्यक्ष राहतील. सोनिया गांधी यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपत आहे हे खरे आहे, परंतु त्याच दिवशी हे पद रिक्त होईल याचा अर्थ असा नाही. ते म्हणाले की, सोनिया गांधी अध्यक्ष आहेत आणि योग्य प्रक्रिया होईपर्यंत ती पदावर कायम राहतील आणि नजीकच्या काळात त्यांच्या निर्देशांचे पालन केले जाईल.

सिंघवी म्हणाले, त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. कॉंग्रेस कार्यकारी समितीची निवड करण्याची एक प्रक्रिया आहे. हे नजीकच्या भविष्यात केले जाईल आणि त्याची माहिती आपणास देण्यात येईल. हे कॉंग्रेसच्या घटनेत लिहिले आहे, आम्ही ते करण्यास बांधील आहोत आणि तेकरण्यास बाध्य आहोत.

तर दुसरीकडे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे की, पक्षाचा हेतू व दिशाहीन धारणा दूर करण्यासाठी पूर्णवेळ अध्यक्ष शोधण्याची प्रक्रिया तात्काळ केली पाहिजे. पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व करण्याचे धाडस, क्षमता आणि योग्यता राहुल गांधींमध्ये आहे, असे थरूर म्हणाले. थरूर यांनी केलेल्या विधानामुळे पक्षामध्ये मतभिन्नता असल्याचे पुन्हा उघड झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER