चलनी नोटांमुळे विषाणूचा संसर्ग शक्य- रिझर्व्ह बँक

RBI - Reserve Bank Of India

नवी दिल्ली : चलनी नोटांद्वारे कोणत्याही प्रकारच्या विषाणूचा संसर्ग पसरू शकतो, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले असून जनतेने नोटांऐवजी ‘डिजिटल पेमेंट’चा जास्तीत जास्त वापर करावा, अशी सूचना केली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) याबाबत रिझर्व्ह बँकेला पत्राद्वारे प्रश्न विचारला होता.

नोटांमुळे विषाणूचा प्रसार होतो का? याबाबत कैटने सातत्याने पाठपुरावा केला आहे. कॅटने ९ मार्च २०२० रोजी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र लिहिले होते. त्यामध्ये नोटांमुळे विषाणू आणि जीवाणूचा प्रसार होतो का, याबाबत माहिती मागितली होती. त्याच्या उत्तरात आरबीआयने कॅटला संकेत दिला आहे की, नोटांद्वारे व्हायरसचा प्रसार होऊ शकतो.

कॅटला पाठवलेल्या उत्तरात आरबीआयने म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लोकांनी मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, कार्डचा वापर करून डिजिटल पेमेंट करावे.

कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, चलनी नोटांद्वारे कोणत्याही जीवाणू किंवा विषाणूचा जलदगतीने प्रसार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही आरबीआयला त्याबद्दल प्रश्न विचारला. गेल्या वर्षभरापासून आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहोत. आरबीआयने आता आमच्या प्रश्नाकडे लक्ष दिले आहे. परंतु त्यांनी मूळ प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही.

आरबीआयने असे कुठेही म्हटले नाही की, नोटांद्वारे व्हायरसचा प्रसार होत नाही. त्यांनी संकेत दिले आहेत की, चलनी नोटांद्वारे व्हायरसचा प्रसार होतो. त्यामुळेच डिजिटल पेमेंट करण्याचा सल्ला दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER