मुंबईत जमावबंदी कायम; मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढवली

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai police) गुरुवारी शहरातील जमावबंदीची मुदत ३० सप्टेंबपर्यंत (30 September) वाढवली. या आदेशातून अत्यावश्यक सेवा आणि टाळेबंदी शिथिल करताना शासनाने मुभा दिलेल्या व्यक्ती, सेवा, व्यवसायांना सूट असेल. पोलिसांनी जारी केलेल्या आदेशामुळे संपूर्ण टाळेबंदी, संचारबंदी जारी होणार, असा गैरसमज पसरल्याने काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला होता.

मात्र पोलीस आयुक्त परमबिर सिंह (Parambir Singh) यांनी यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले आहे .मुंबई पोलिसांनी ३१ ऑगस्टला जारी केलेल्या आदेशाची मुदत ३० सप्टेंबपर्यंत वाढविली आहे. आधीच्या आणि आताच्या आदेशांमध्ये काही बदल नाहीत, नवे निर्बंध नाहीत, असे स्पष्ट केले. अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय आणीबाणीसह अत्यावश्यक सेवा आणि शासनाची परवानगी असलेल्या व्यक्तींना संचारबंदीचे नियम लागू नसतील. शासनाने टप्प्याटप्प्याने टाळेबंदी शिथिल केली. या प्रत्येक टप्प्यात ठरावीक सेवा, व्यवसायांना मर्यादित प्रमाणात मुभा दिली. शासनाने मुभा दिलेल्या सेवा, व्यवसायाशी संबंधित व्यक्ती पूर्वीप्रमाणेच प्रवास करू शकतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER