तुळजाभवानी मंदिर परिसरात जमावबंदी लागू ; भाजपचं आंदोलन उधळलं जाणार

Shri Tulja Bhavani Temple

तुळजापूर : राज्यातील मंदिरे उघडा ही मागणी घेऊन भाजप (BJP) आक्रमक झाली आहे. तुळजाभवानी मंदीरात (Tulja Bhavani Temple) भाजपचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. मात्र, काल रात्री प्रशासनाकडून आंदोलन स्थळावरील तंबू काढून टाकण्यात आलाय. तुळजाभवानी मंदिर परिसरात जिल्हाधिकाऱ्यांकडून जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार तुळजाभवानी मंदिराच्या 300 मीटर परिसरात कुणालाही प्रवेश करता येणार नाही.

भाजप आध्यात्मिक आघाडीचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मंडप नगर परिषद प्रशासनानं रातोरात उखडून टाकला आहे.

यावर प्रतिक्रिया देताना भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी राज्य सरकारविरुद्ध संताप व्यक्त केला आहे.

राज्यातील ठाकरे सरकार कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलं आहे. मुख्यमंत्र्यांना दोन वेळा पत्र लिहून त्यांनी भेटीसाठी वेळ दिला नाही. मुख्यमंत्र्यांना साधू-संतांशी बोलायला वेळ नाही’, अशी टिका भाजप आध्यात्मिक आघाडीच्या तुषार भोसले यांनी केली आहे. काल राज्यभरातील साधू-महंतांच्या उपस्थितीत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिराच्या मुख्यद्वारावर देवीची आरती केली. त्यानंतर राज्यातील मंदिरं सुरु करण्याच्या मागणीसाठी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्यासाठी मंडप काढला तरी आज सकाळी रणचंडी यज्ञ व आंदोलन करणार असल्याची भूमिका स्पष्ट केली. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करताय मात्र त्याला बळी पडणार नाही ,जोपर्यंत मंदिर खुले होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार तुषार भोसले यांनी व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER