संस्कृती नटली आईच्या साडीत

sanskruti balduge

लहानपणी प्रत्येक मुलगी आईची साडी नेसून मिरवते. संक्रांतीचे हळदीकुंकू असो किंवा गौरीचा सण बालपणामध्ये प्रत्येक मुलीला आईची साडी नेसण्याची हौस असायची. अभिनेत्री संस्कृती बालगुडेनेही (Sanskruti Balgude) यंदाच्या दिवाळीत आईच्या खास आवडत्या साडीतले फोटो सोशल मीडियावर शेअर करत आईची साडी अशी ओळ लिहित लक्ष वेधून घेतले.

दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी तसेच अभिनेत्रींनी फेस्टिवल लूकमधले फोटो त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. भूमिकेच्या निमित्ताने किंवा त्या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने त्या त्या भूमिकेला सुट होणारेच ड्रेस घालावे लागतात आणि त्यामुळे कलाकारांच्या सोशल मीडिया पेजवर हे त्यांच्या मालिका सिनेमातील सीनचे फोटो प्रसिद्ध होत असतात. पण सणावारांच्या निमित्ताने कलाकारांना सुट्टी मिळते. त्या सुट्टीत देखील नटणे मुरडन्याचा मोह बाजूला ठेवत नाहीत.

अशा सोशल मीडिया वरील पोस्टच्या मांदियाळी मध्ये अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने पोस्ट केलेल्या तिच्या आईच्या पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो तिच्या चाहत्यांनाही खूप आवडले. या साडी मध्ये तिने वेगवेगळ्या पोझ मध्ये फोटो काढले आहेत आणि शेअर केले आहेत संस्कृती सांगते, मला लहानपणापासूनच आईच्या साड्या नेसायला खूप आवडतं. शाळा कॉलेजमध्ये काही कार्यक्रम असला की मी आईच्या आवडत्या साड्या बाजूला काढून ठेवायचे आणि त्यापैकी अनेक साड्या मी माझ्या कॉलेजमध्ये असताना नेसलेल्या आहेत. आता सध्या माझी आई देखील ड्रेस घालते पण तिच्याकडे साड्यांचे खूप छान कलेक्शन आहे. गंमत म्हणजे आईच्या ज्या साड्या मला आवडतात त्याच्या साड्यांवर मी माझ्या स्वतःच्या मापाचे ब्लाऊज देखील घेऊन ठेवले आहेत जेणेकरून मला आईची साडी कधीही नेसता येईल. यंदाच्या दिवाळीतही मी आईच्या साडी मध्ये फोटो काढायचं ठरवलं होतं. ज्या साडी मध्ये मी सध्या दिवाळीचे फोटो शेअर केले आहेत ती पिवळ्या आणि काहीशी पोपटी रंगाची झाक असलेली ही साडी नेसल्या नंतर खूप छान दिसते.

गेल्या काही दिवसात अनेक सेलिब्रिटी कलाकारांनी त्यांच्या आईच्या साडी सोबतच अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. त्यामध्ये अभिनेता रितेश देशमुखने देखील त्याच्या आईच्या साडीपासून यंदा दिवाळीला स्वतःसाठी आणि मुलांसाठी कुर्ता शिवला होता आणि त्याचे फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. संस्कृतीच्या आईच्या साडीतल्या फोटोनाही चाहत्यांकडून खूप साऱ्या लाईक आणि कमेंट मिळाल्या आहेत. वेगवेगळ्या कामातून वेळ काढत संस्कृती दिवाळीसाठी पुण्यात पोहोचली तेव्हा तिने आईची ही पिवळ्या रंगाची साडी हेरून ठेवली होती. पिंजरा या मालिकेतून संस्कृती बालगुडे हिने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. सर्व लाईन व्यस्त आहेत हा सिनेमा देखील गाजला होता.

या सिनेमातल्या तिच्या अभिनयाबद्दलही तिचं कौतुक झालं होतं. संस्कृतीने भरतनाट्यममध्ये तीन परीक्षा दिल्या असून ती उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे. तिला भरतनाट्यम मध्ये करिअर करण्याची इच्छा होती मग त्यानंतर मात्र दिला अभिनय मध्ये रस वाटू लागला. अभिनय करत असताना देखील पिंजरा सारख्या मालिकेतून तिने नृत्याची हौस भागवून घेतली आहे. नृत्य आणि अभिनय या दोन्ही ला व्यासपीठ मिळेल या दोन्हीला वाव मिळेल अशा भूमिकेच्या नेहमीच ती शोधात असते. घरी आणि मित्रपरिवार यामध्ये बिट्टा या टोपण नावाने संस्कृतीला बोलवलं जातं हे खूप कमी जणांना माहीत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER