चेन्नईचे यश पोहोचलेय ‘डबल फिगर्स’मध्ये

CSK IPL 2020

चेन्नई सुपर किंग्जची (CSK) यंदाच्या आयपीएलमधील(IPL) कामगिरी आतापर्यंत तरी साधारणच आहे पण तरीसुध्दा त्यांचे नवनवीन विक्रम सुरुच आहेत. ताज्या विक्रमात आयपीएलमधील प्रतिस्पर्धी सर्व सक्रिय संघांवर किमान 10 विजय मिळवणारे ते पहिलेच ठरले आहेत. मंगळवारी सनरायजर्स हैदराबादवर (SRH)\ विजय मिळवून त्यांनी हा टप्पा पूर्ण केला. त्यांचा हा सनरायजर्सवरचा 10 वा विजय होता. चेन्नईचा संघ मध्यंतरी दोन वर्ष आयपीएलमध्ये खेळला नव्हता नाहीतर हा विक्रम त्यांनी आधीच केला असता.

शिवाय सनरायजर्स हैदराबादवरील (SRH) या विजयासह त्यांनी स्वतःला स्पर्धेत कायम राखले आहे. सोबतच2010 मधील कामगिरीशी त्यांचा विलक्षण योगायोगही सुरू आहे. 2010 मध्येसुध्दा त्यांनी पहिल्या 7 पैकी 5 सामने गमावल्यावर आठवा सामना जिंकून स्पर्धेत पुनरागमन केले होते आणि नंतर थेट विजेतेपद पटकावले होते. यंदासुध्दा त्यांचा प्रवास तसाच आहे.

आता विजेतेपदाचाही योगायोग होतो का, हेच बघायचे.

त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाविरुध्दच्या विजयांची आकडेवारी अशी….

विरुध्द —– सामने —— विजय
दिल्ली —– 21 ———- 15
बँगलोर —- 24 ———- 15
राजस्थान – 21 ———– 14
पंजाब —– 22 ———– 13
कोलकाता- 21 ———– 13
मुंबई——- 29 ———- 12
हैदराबाद— 13 ———– 10

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER