रैनाच्या कठीण काळात CSK त्याच्या सोबत आहे, माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला: एन. श्रीनिवासन

N. Srinivasan - Suresh Raina

IPL सोडून भारतात परतलेल्या सुरेश रैनाशी (Suresh Raina) संघाचा मालक एन. श्रीनिवासन (N. Srinivasan) नाराज दिसत होते. यश हे त्याच्या डोक्यावर चढले आहे म्हणून तो चिडचिडा झाला आहे, असेही त्यांचे वक्तव्य चर्चेत होते. परंतु श्रीनिवासन यांनी हे वक्तव्य स्पष्ट करताना सांगितले की माध्यमांनी त्यांचे विधान चुकीच्या संदर्भात मांडले आहे.

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) स्टार फलंदाज सुरेश रैना युएईमध्ये IPL २०२० स्पर्धा सोडत मायदेशी परतला आहे. यावर सोमवारी जेव्हा चेन्नई सुपर किंग्जचे मालक आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनावासनचे हे विधान चर्चीत झाले की यश हे त्याच्या डोक्यावर चढले आहे म्हणून तो चिडचिडा झाला आहे, त्यामुळे रैनाचे चाहते आणि जाणकार आश्चर्यचकित झाले. पण श्रीनिवासन यामुळे नाराज आहेत, ते म्हणाले की मीडियाने त्यांच्या वक्तव्याची चुकीची माहिती दिली आहे.

श्रीनिवासन यांनी वृत्तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी या संपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा केली आहे. ते म्हणाले, “CSK फ्रँचायझीमध्ये रैनाचे योगदान कुठूनही नंबर 2 वर नाही आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे लोक गोष्टींचा चुकीचा अर्थ लावत आहे.”

ते म्हणाले, ‘CSK फ्रँचायझीमध्ये त्याचे योगदान वर्षानुवर्षे विलक्षणीय आहे. हे आम्हाला समजले पाहिजे कि रैना सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे आणि आम्ही त्याला वेळ दिला पाहिजे.’

IPL च्या सुरूवातीपासून म्हणजेच २००८ पासून रैना CSK चा एक भाग आहे आणि या काळात त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. तो ‘चेन्नई बॉय’ आहे, ज्याला कर्णधार एमएस धोनी किंवा थाला याच्यानंतर ‘चिन्नाथला’ (नेतृत्वात क्रमांक २) नाव मिळाले आहे.

IPL मध्ये रैनाच्या नावावर १८९ डावांमध्ये एक शतक आणि ३८ अर्धशतकांसह ५,३६८ धावांचा समावेश आहे. या काळात रैनाचा स्ट्राइक रेट १३७.१४ आहे, IPL च्या १२ सत्रानंतर रैना लीगमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. याशिवाय आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या बहुतेक सामन्यांच्या बाबतीत तो अव्वल क्रमांकाचा खेळाडू देखील आहे. या लीगमध्ये रैनाने १९३ सामने खेळले आहेत, जे धोनी (१९०) पेक्षा ३ अधिक आहेत.

CSK चे मालक श्रीनिवासन म्हणाले की, “असे उत्कृष्ट योगदान अमूल्य आहे. ही फ्रॅन्चायझी नेहमी रैनाच्या पाठीशी उभी राहील आणि या कठीण दिवसांतही आमचा पूर्ण पाठिंबा असेल.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER