चेन्नईने यापूर्वीही गमावले आहेत पहिल्या 7 पैकी 5 सामने

CSK

पहिल्या सात सामन्यात पाच पराभव, चेन्नई सुपर किंग्जचे (Chennai Super Kings). काही खरे नाही अशी चर्चा आता सुरू झाली आहे. सीएसकेच्या व्यवस्थापनासह त्यांचे चाहतेही आता कसे होईल, याच्या चिंतेत आहेत मात्र त्यांच्यासाठी एक दिलासादायक बातमी आहे. अजुनही त्यांच्यासाठी सर्व काही संपलेले नाही. अजुनही संधी आहे.

आयपीएलमधील (IPL) चेन्नईचा इतिहास पाहिला तर दिसुन येईल की एवढी खराब सुरुवात त्यांची काही पहिल्यांदाच झालेली नाही. 2010 च्या आयपीएलमध्येही त्यांनी आपले पहिले सात पैकी पाच सामने गमावले होते, तरीसुध्दा त्यावेळी त्यांनी विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे सीएसकेसाठी सर्व काही संपलेय असे काही नाही.

2010 च्या स्पर्धेत सीएसकेने साखळीचे 14 पैकी सात सामने जिंकले व सात गमावले होते आणि त्यांच्यापेक्षा अधिक विजय मुंबई इंडियन्स (10) व डेक्कन चार्जर्सच्या (8) नावावर होते पण शेवटी विजेतेपदाची ट्राॕफी चेन्नईनेच उंचावली होती. अंतिम सामन्यात त्यांनी मुंबईला 22 धावांनी मात दिली होती. आता यंदासुध्दा चेन्नईचे आणखी सात सामने बाकी आहेत. त्यात आपली कामगिरी सुधारली तर कदाचित 2010 ची पुनरावृत्ती होऊ शकते.

आणि आयपीएलमध्ये चांगली सुरुवात म्हणजे यशाची गॕरंटी असेही काही नाही. 2014, 2015 आणि 2019 च्या आयपीएलमध्ये त्यांनी पहिल्या सात सामन्यांपैकी एकच सामना गमावला होता पण या तिनही वर्षी ते आयपीएल जिंकू शकले नव्हते. 2014 मध्ये ते तिसऱ्या स्थानी तर इतर दोन वेळा उपविजेते राहिले होते.

सीएसकेचे पहिल्या सात सामन्यांतील पराभव

2008- 3
2009- 3
2010- 5
2011- 3
2012- 3
2013- 2
2014-1
2015- 1
2018- 2
2019- 1
2020- 5

यंदाचे पहिले सात सामने
1) वि. मुंबई इंडियन्स – विजय- 5 गडी
2) वि. राजस्थान राॕयल्स – पराभव- 16 धावा
3) वि. दिल्ली कॕपीटल्स – पराभव- 44 धावा
4) वि. सनरायजर्स – पराभव- 7 धावा
5) वि. किंग्स इलेव्हन – विजय- 10 गडी
6) वि. केकेआर – पराभव- 10 धावा
7) वि. राॕयल चॕलेंजर्स- पराभव- 37 धावा

2010 मधील पहिले सात सामने
1) वि. डेक्कन चार्जर्स- पराभव- 31 धावा
2) वि. नाईट रायडर्स- विजय- 55 धावा
3) वि. दिल्ली डेअरडेविल्स- विजय- 5 गडी
4) वि. किंग्ज इलेव्हन- पराभव (सुपर ओव्हर)
5) वि. राॕयल चॕलेंजर्स- पराभव- 36 धावा
6) वि. मुंबई इंडियन्स- पराभव- 5 गडी
7) वि. राजस्थान राॕयल्स- पराभव – 17 धावा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER