केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर होणार ‘क्रिप्टोकरन्सी बिल’

नवी दिल्ली : राज्यसभेत ‘क्रिप्टोकरन्सी बिलाला (Cryptocurrency Bill)’ अंतिम स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. त्याचबरोबर हे बिल लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. आरबीआयने (RBI) २०१८ मध्ये क्रिप्टोकरन्सीशी संबंधित देवाणघेवाण बँकांना प्रतिबंधित केले होते. दरम्यान हे निर्बंध गेल्या वर्षी मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाने (SC) हटवले होते.‘क्रिप्टोकरन्सी’साठी देशात कायदा नाही. अशा वेळी सरकार ‘क्रिप्टोकरन्सी’वर वेगळा कायदा करण्याचा विचार करत आहे. १७व्या लोकसभेतील अर्थसंकल्पात केंद्र सरकारने एक बिल सूचीबद्ध केले होते.

त्यात भारताच्या सर्व खासगी ‘क्रिप्टोकरन्सी’ जसे बिटकॉईन, ईथर आणि रिपलवर निर्बंध लादण्याचा प्रस्ताव आहे. आरबीआयने २५ जानेवारीच्या बुकलेटमध्ये म्हटले की, क्रिप्टोकरन्सी आणि येणाऱ्या रिस्कबाबत सरकार सावध आहे. पण सद्यःस्थिती करन्सीच्या डिजिटलायझेशनच्या पर्यायाबाबत विचार सुरू आहे. क्रिप्टोकरन्सी एक विकेंद्रित बचत प्रणाली आहे. म्हणजे पारंपरिक मुद्रानुसार कोणत्याही केंद्रीय बँकेकडून ती रेग्युलेट केली जाऊ शकत नाही, तसेच आरबीआयसारख्या केंद्रीय बँकांसाठी ही चिंतेची बाब आहे. आरबीआयकडून युरोपियन सेंट्रल बँकेलाही ‘क्रिप्टोकरन्सी’बाबत चेतावणी देण्यात आली आहे. डिजिटल किंवा क्रिप्टोकरन्सी इंटरनेटवर चालणारी एक व्हर्च्युअल करन्सी आहे. ‘बिटकॉईन’सह जगभरात अनेक ‘क्रिप्टोकरन्सी’ आहेत. त्यात रेड कॉईन, सिया कॉईन, सिस्कॉईन, व्हॉईस कॉईन आणि मोनरो यांचा समावेश आहे.

कोरोना काळामध्ये बिटकाईनने त्यांचे कमाईचे रेकॉर्डस मोडले आहेत. ही ऑनलाईन स्वरूपातील क्रिप्टोकरन्सी आहे. कोरोना काळात बिटकॉईनमध्ये गुंतवणूक वाढली आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या बिटकॉईनने कोविडमध्ये मोठी झेप घेतली. इंटरनेटवर बिटकाईनसारख्या बर्‍याच क्रिप्टोकरन्सी आहेत. सध्या जगात १५०० क्रिप्टोकरन्सी आहेत. फेसबुकने काही दिवसांपूर्वी लिब्रा या नावाची क्रिप्टोकरन्सी जाहीर केली होती. बिटकाईन एथरियम आणि लिब्रा यांच्यापेक्षा वेगाने वाढत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER