मनसे जोरदार इनकमिंगला सुरुवात ; ‘कृष्णकुंज’बाहेर झुंबड, काही डबेवालेही करणार राज ठाकरेंच्या उपस्थित प्रवेश

raj-thackerays

मुंबई :- मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी (BMC Election 2021) विविध पक्षांमध्ये इनकमिंग सुरु झाली आहे . मनसेमध्ये (MNS) प्रवेश करण्यासाठी अनेकांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे निवासस्थान असलेल्या कृष्णकुंजबाहेर गर्दी केली आहे .

बोरिवली विधानसभा क्षेत्रातील वकिलांचा मनसेत पक्षप्रवेश होत आहे. याशिवाय क्षितीज गृपचे सदस्य मनसेत पक्षप्रवेश करणार आहेत. मनसेने ज्या शाळेच्या फी वाढीविरोधात आंदोलन केलं, त्या रायन इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पालकही मनसेवासी होत आहेत. इतकंच नाही तर डबेवाल्यांचे काही प्रतिनिधी मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे .

दरम्यान मराठीसाठी आग्रह असलेल्या मनसेने अ‌ॅमेझॉनविरुद्ध मोहीम हाती घेतल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा राज ठाकरे अ‌ॅक्शन मोडमध्ये आहेत.

ही बातमी पण वाचा : मनसे कोल्हापूर महापालिका रिंगणात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER