कोरोना : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पार

Corona Virus

मुंबई : राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. आज राज्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी तब्बल 3 हजार 41 कोरोना रुग्ण आढळून आले. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पुढे गेला आहे. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50 हजार 231 वर पोहोचली आहे.

राज्यात आज दिवसभरात 1196 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात 14 हजार 600 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात 33 हजार 988 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यात दिवसभरात 58 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांचा आकडा 1 हजार 635 वर जाऊन पोहोचला. मागील आठ दिवसांपासून राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढली. या आठही दिवसांत 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर आज दिवसभरात तीन हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं राज्यातल्या जनतेची चिंता वाढली आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे, पुणे, औरंगाबाद, नाशिक, रायगड, पालघर, सोलापूर, नागपूरमध्ये रुग्णांची संख्या लक्षणीय आहे.

मुंबई दिवसभरात 1 हजार 566 रुग्णांची वाढ

मुंबईत आज दिवसभरात 1 हजार 725 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या आता 30 हजार 542 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात एकूण 39 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबळींची संख्या 988 झाली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER