अबब या नायिका घेतात इतक्या कोटींचे मानधन

काही दिवसांपूर्वी एका शो मध्ये अनिल कपूरने (Anil Kapoor) नायिकांच्या मानधनाबाबत बोलताना सांगितले होते, मी जेव्हा नायक म्हणून काम करीत होतो तेव्हा अनेकदा माझ्यापेक्षा जास्त पैसे नायिकांना दिले जात असत. पण मी कधीही त्याबाबत तक्रार केली नाही. एवढेच नव्हे तर मी निर्माता असलेल्या एका सिनेमासाठी करीना कपूरने नायकापेक्षा जास्त मानधन घेतल्याचा किस्साही त्याने सांगितला होता. त्यावरून सध्या बॉलिवुडमध्ये (Bollywood) यशाच्या शिखरावर असलेल्या किती मानधन घेतात याचा धांडोळा घेतला असता त्यांच्या मानधनाचे जे आकडे समोर आले त्याने थक्कच व्हायला झाले. तुम्हालाही हे आकडे पाहून नक्कीच थक्क व्हायला होईल. मात्र नायक यांच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक मानधन एका सिनेमासाठी घेतात.

दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सध्या चांगलीच फॉर्मात आहे. 2021 मध्ये तिचे एक-दोन नव्हे तर जवळ जवळ 6 सिनेमे रिलीज होणार आहेत. दीपिकाने 2007 फरहा खान दिग्दर्शित ‘ओम शांती ओम’मधून दीपिकाने रुपेरी पडद्यावर आगमन केले होते. पहिल्याच चित्रपटात तिचा नायक होता शाहरुख खान. या सिनेमासाठी दीपिकाला अत्यंत मामूली रक्कम देण्यात आली होती. मात्र नऊ वर्षातच म्हणजे 2016 मध्ये दीपिकाने एका सिनेमासाठी 15 कोटी रुपयांपर्यंत झेप घेतली होती. 2021 मध्ये दीपिका एका सिनेमासाठी 25 ते 26 कोटी मानधन घेत असल्याचे सांगितले जात आहे. जाहिरातींचे मानधन हे एजंसी आणि कंपनीवर अवलंबून असते. तेसुद्धा 5 ते 10 कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे तिचा पति रणवीर सिंहला (Ranveer Singh) एका सिनेमासाठी 15 ते 18 कोटी रुपये दिले जात आहेत.

कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या चांगलीच चर्चेत आहे. एका छोट्याशा गावातून मुंबईत येऊन कोणीही गॉडफादर नसताना कंगनाने बॉलिवुडमध्ये जे यश मिळवले आहे त्याला तोड नाही. नायिकाप्रधान सिनेमा सुरु झाला की सर्वप्रथम कंगनाचेच नाव निर्मात्याच्या डोळ्यासमोर येते. कंगनाने सोलो हिट दिल्याने तिच्यावर निर्मात्यांचा विश्वास वाढत आहे. 2016 मध्ये एका सिनेमासाठी 11 कोटी रुपये मानधन घेणारी कंगना आता दीपिकाच्या बरोबरीने म्हणजे 25 ते 26 कोटी रुपये घेत आहे.

आलिया भट्टने (Alia Bhatt) करण जोहरच्या सिनेमातून रुपेरी पडद्यावर आगमन केले. तिची बबली इमेज प्रेक्षकांना खूपच आवडल्याने तिच्याकडे सिनेमांची रांग लागली होती. राजी, गली बॉय, हायवे असे अनेक वेगळे आणि हिट सिनेमे आलियाने दिले आहेत. त्यामुळेच आज तिच्याकडे साधारणतः एक डझन सिनेमे आहेत. 2016 मध्ये एका सिनेमासाठी 3 कोटी रुपये घेणाऱ्या आलियाला राजीसाठी 10 कोटी रुपये देण्यात आले होते. आलिया सध्या एका सिनेमासाठी साधारणतः 22 कोटी रुपये घेते असे बॉलिवुडमध्ये सांगितले जाते.

श्रद्धा कपूरनेही (Shraddha Kapoor) कमी कालावधीत बॉलिवुडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिचे काही सिनेमे हिट झाले असून सध्या श्रद्धाकडे मोठ्या बॅनरचे सिनेमे आहेत. लवकरच ती रणबीर कपूरसोबतही दिसणार आहे. श्रद्धा कपूरला एका सिनेमासाठी 8 ते 0 कोटी रुपये मानधन दिले जात आहे.

कॅटरीना कैफ (Katrina Kaif) सध्या हिट नायिका म्हणून ओळखली जात असून तिच्याकडेही अनेक सिनेमे आहेत. चार-पाच वर्षांपूर्वी कॅटरीना एका सिनेमासाठी 6 कोटी रुपये घेत असे. परंतु आता ती एका सिनेमासाठी 12 ते 15 कोटी रुपये घेते. टायगर सिनेमाच्या सीरीजमुळे तिच्या मानधनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

नुकतीच आई झालेली अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या आईपणाचा अनुभव घेत आहे. मात्र पुढील वर्षी ती पुन्हा रुपेरी पडद्यावर आगमन करणार आहे. अनुष्का 2016 मध्ये एका सिनेमासाठी 6 कोटी रुपये घेत असे. गेल्या वर्षीपर्यंत एका सिनेमासाठी तिचे मानधन 10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले होते. अनुष्का निर्मात्रीही झाली असून सिनेमा आणि वेबसीरीजच्या निर्मितीतही तिला चांगली कमाई होत आहे.

दुसऱ्यांदा आई बनणारी करीना कपूरही (Kareena Kapoor) मानधनाच्या बाबतीत खूप आघाडीवर आहे. चार-पाच वर्षांपूर्वी 9 कोटी रुपये प्रति सिनेमा मानधन घेणारी करीना सध्या एका सिनेमासाठी 18 ते 20 कोटी रुपये आकारत आहे.

हॉलिवुडवासी (Hollywood) झालेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) कडे सध्या हिंदी सिनेमे नाहीत. 2016 मध्ये ती एका सिनेमासाछी 8 ते 9 कोटी रुपये घेत होती. आताही तिला 10 ते 12 कोटी रुपये एका सिनेमासाठी दिले जात असल्याचे सांगितले जात असले तरी सध्या तिला साईन करण्यासाठी एकही निर्माता जात नाही. काम नसल्याने तिने मानधन कमी केल्याचे बोलले जात आहे.

विद्या बालनकडे (Vidya Balan) सध्या जास्त सिनेमे नाहीत. परंतु एकटीच्या खांद्यावर संपूर्ण सिनेमा तोलण्याची ताकद तिच्यात असल्याने तिला एका सिनेमासाठी 8 ते 10 कोटी रुपये आजही दिले जात आहेत.

सोनाक्षी सिन्हालाही (Sonakshi Sinha) 6 ते 8 कोटी रुपये एका सिनेमासाठी दिले जात आहेत. याशिवाय अन्य नायिकांना त्यांच्या क्षमतेनुसार 5 ते 10 कोटी रुपयांचे मानधन दिले जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER