माॅनसून सिजनचा लेटेस्ट फॅशन ट्रेंड ‘क्राॅप्ड पँट्स’…

cropped-pants

पावसाळ्यात बऱ्याच मुली ट्राऊजर घालणे टाळतात. कारण पावसामध्ये घालून बाहेर गेले की चिखलापासून अख्ख ट्राऊजर भरतो. त्यापेक्षा न घालणेच बरे. पण आता तुम्ही पावसाळ्यात देखील ट्राऊजर बिंदास वापरू शकता. कारण आता फॅशन मध्ये आले आहे ‘क्राॅप्ड पँट्स’.जी तुम्हाला बनवेल ट्रेंडी आणि कम्फर्टेबल. बाॅलीवूडच्या काही अभिनेत्रींनी ‘क्राॅप्ड पँट्स’ ला आपले फॅशन स्टेटमेंट बनवून काॅलेज गर्ल साठी आयडल बनले आहेत. कटरिना, डायना पेंटी,जॅकलिन आणि इशा गुप्ता सारखे अभिनेत्री ‘क्राॅप्ड पँट्स’ ला आप-आपल्या परीने कॅरी करतांना दिसले.

क्राॅप्ड पँट्ससध्या मार्केट मध्ये देखील सध्या ‘क्राॅप्ड पँट्स’चे ट्रेंड सुरु आहे. तुम्हाला ‘क्राॅप्ड पँट्स चे वेगवेगळे वेरायटी बघायला मिळेल. जर तुम्ही आपल्या फ्रेंड्स सोबत पिकनिक प्लान करत असाल तर डार्क कलरचा हाई-वेस्ट क्राॅप्ड पँट् चूज करावे. त्यावर कॅजुअल टी-शर्ट वापरावे. हा लुक खूप कुल दिसतो. शिवाय कम्फर्टेबल ही राहील.पार्टी साठी क्राॅप्ड पँट्स’ सोबत क्राॅप्ड टाॅप घालावे. सोबत बटन इअरिंग आणि हाय हिल्स सोबत लुक ला पूर्ण करावे. रोमांटिक डेटसाठी माॅनसून पेक्षा बेस्ट सिजन दुसर होऊच नाही शकत. मघ ब्लॅक ‘क्राप्ड पँट्स’ वर रेड कॉर्सेट टॉप वापरा. हा लुक तुमच्या डेटसाठी परफेक्ट राहील. तुम्ही जर वर्किंग वुमेन असाल तर क्राॅप्ड पँट्स वर सिम्पल स्पेगेटी आणि त्यावर लाँग काटनशर्ट घालू शकता. हा लुक तुम्हाला  प्रोफेशनल लुक देईल सोबतच सर्वांपेक्षा हटके दिसाल.

ही बातमी पण वाचा : बेस्ट शूज फाॅर मॉनसून