सांगलीत १५ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान

Sangli Crop Damage

सांगली : जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात झालेल्या अतिवृष्टीचा शेतीला जबर फटका बसला आहे. सुमारे 15 हजार हेक्टरमधील (15000 Hector) पिके बाधित झाली आहेत. पीक वाहून गेल्याने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. अद्याप शेतकऱ्यांना एकही रुपयांची मदत मिळालेली नाही. त्यामुळे नको पंचनामे, नको आश्वासने आता हवी थेट आर्थिक मदत, अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.

गेल्या वर्षी महापूर आणि आता परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेती आणि शेतकरी रस्त्यांवर आला आहे. अतिवृष्टीने हजारो एकरातील काढणीला आलेली पिके तर काही शेतकऱ्यांची काढून शेतात ठेवलेली पिके पूर्णपणे पाण्यात गेल्याने पुरती नष्ट झाली आहेत. अनेकांचा ऊस शिवारात कुजून गेला. फळबागा पुरत्या आडव्या झाल्या. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. परिणामी याचा जिल्ह्याच्या अर्थकारणाला देखील मोठा फटका बसला आहे.

तालुकानिहाय झालेले नुकसान (हेक्टर मध्ये)

मिरज : 72 गावांतील 1 हजार 81 शेतकऱ्यांचे 553, वाळवा : 59 गावातील 1 हजार 451 शेतकऱ्यांचे 404, शिराळा : 79 गावातील 438 शेतकऱ्यांचे 271, पलूस : 35 गावांतील 330 शेतकऱ्यांचे 117, खानापूर : 65 गावांतील 748 शेतकऱ्यांना 150, तासगाव : 69 गावातील 9 हजार 360 शेतकऱ्यांचे 3 हजार 120, कडेगाव : 16 गावातील 422 शेतकऱ्यांचे 75 , आटपाडी : 60 गावातील 2 हजार 370 शेतकऱ्यांचे 1 हजार 466, जत : 125 गावातील 2 हजार 964 शेतकऱ्यांचे 1 हजार 05 आणि कवठेमहांकाळ : 49 गावातील 664 शेतकऱ्यांचे 268 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER