विटा परिसरात गारपीठ ; पिकांचे नुकसान , घरांची पडझड

गारपीठ

सांगली : रविवारी दुपारी अचानक विटा शहरासह खानापूर तालुक्यातील काही परिसराला पावसाने झोडपले . कुर्ली गावाला वादळी वारे आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. या वादळी वाऱ्यामुळे 26 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबाग, टोमॅटो, ढबू मिरचीसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

रविवारी सकाळपासूनच वातावरणात बदल होऊन मेघगर्जनांसह पावसाला सुरुवात झाली होती . त्यानंतर कुर्ली परिसरात जोरदार गारपीट झाली. या गारपीटीचा फटका द्राक्ष, टोमॅटो, ढोबळी मिरची पिकासह अन्य पिकांना बसला आहे. कुर्ली, घाडगेवाडी परिसरात वादळी वाऱ्याने जनावरांच्या गोठ्यावरील पत्रे उडून गेले आहेत. उडालेले पत्रे अंगावर पडून जनावरे जखमी झाली आहेत. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार ऋषीकेत शेळके यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER